Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

रोजगार न देऊ शकल्यानेच सरकारकडून सवर्णांना आरक्षणाचे गाजर; राज्यसभेत विरोधकांची टीका

आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांच्या आरक्षण विधेयकावरून बुधवारी राज्यसभेत झालेल्या चर्चेत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच झोडपले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये सरकार पुरेसे रोजगार निर्माण करू शकले नाही. हेच शल्य मनाला बोचत असल्याने सरकारने सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल्याची टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केली. सरकारने २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. याचा जाब विचारल्यास पकोडानॉमिक्स चे तत्वज्ञान मांडले जाते. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यापैकी कोणतीच योजना पूर्णत्वास जाऊ शकलेली नाही, अशी टीका डेरेक ओब्रायन यांनी केली. तर काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनीही सरकारला रोजागारनिर्मितीवरून धारेवर धरले. देशामध्ये याच गतीने रोजागार निर्माण होत राहीले तर मोदी सरकारच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी ८०० वर्षे लागतील, असा टोला त्यांनी हाणला. मोदी सरकारने २ कोटी रोजगारांचे दिलेले आश्वासन बाजूलाच राहू द्या. मात्र, गेल्या एका वर्षात जवळपास १ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळेच मोदी सरकारने आता आरक्षणाचे गाजर पुढे केले आहे. जेणेकरून सवर्ण समाजातील पालकांना मोदी आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी खूप काही करत असल्याचे वाटेल. मात्र, हे आरक्षण दिले तरी तेवढे रोजगार तरी देशात आहेत का, असा थेट सवाल शर्मा यांनी विचारला.

Leave A Comment