Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

कुंभारझरी परिसरात शॉटसर्किटमुळे ६० एकरमधील ऊस जळून २१ शेतकऱ्यांचे नुकसान

जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथील एका शेतात शॉटसर्किटमुळे अचानक आग लागली. यात लागून असलेल्या २१ शेतकऱ्यांचा ६० एकर ऊस जळाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. कुंभारझरी परिसरातील एका शेतात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागताच शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगेने रुद्ररुप धारण केले. त्यानंतर देऊळगाव राजा व भोकरदन येथील अग्निशमन दलाचे बंब बोलविण्यात आले होते. या आगेत जवळपास ६० एकर ऊस जळून खाक झाला असून, यात शेतकऱ्यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात गजानन चव्हाण, प्रयाग चव्हाण, पार्वताबाई चव्हाण, दुर्गा चव्हाण, माधव चव्हाण, प्रकाश चव्हाण, शरद चव्हाण, मनोहर चव्हाण, नामदेव चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, दामुता चव्हाण, सुभाष चव्हाण, अशोक चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, राजाराम चव्हाण, साहेबराव चव्हाण, जगन चव्हाण, अनिता चव्हाण, यासह अन्य शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सरपंच संजय चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Comment