Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

युती होगी तो ठीक, नहीं तो पटक देंगे; अमित शहा यांचा शिवसेनेला इशारा

युती होगी तो ठीक, नहीं तो पटक देंगे, अशा स्पष्ट शब्दांत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला इशारा देत, नव्या संघर्षाला तोंड फोडले आहे. २०१४ मध्ये युती नव्हती, तरीही फडणवीस मुख्यमंत्री झाले, याची आठवणही त्यांनी करून दिली. २०१४ पेक्षा २०१९ चा विजय मोठा असेल. ४८ पैकी ४० जागा जिंकण्याची तयारी ठेवावी, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेसाठी अप्रत्यक्षपणे स्वबळाचा नारा दिला.लातुरात रविवारी भाजपाच्या बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, विजयासाठी दोन कोटी मतांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा अधिक सरकारचे लाभार्थी आहेत. त्यामुळे ४० जागा जिंकण्याच्या तयारीला लागा. भाजपाचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कार्यकर्ता आहे. संघटना हीच ताकद आहे. युती होईल की नाही, हे अध्यक्ष ठरवतील. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, भाजपाच्या कामाचा आधार हा संघटन असून, पक्षाचे ११ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. २०१४ मध्ये आपल्याकडे सहा राज्ये होती. आज १६ राज्यांमध्ये भाजपा आहे. २०१९ मध्ये ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपा येईल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. पंतप्रधान आवासमध्ये प्रत्येकाला घर मिळाले आहे. पानिपतची लढाई आपण जिंकलो असतो, तर इंग्रजांनी भारतात राज्य केले नसते. पानिपतची जशी लढाई होती, तशी २०१९ ची लढाई देशासाठी आहे. गठबंधन कोणाचेही होवो, विजय भाजपाचाच आहे. काँग्रेसच्या काळामध्ये ५५ वर्षांत त्यांनी कोणताही विकास केला नाही. उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाले.तर भाजपा सरकारने पाकिस्तानच्या जमिनीवर जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले, असेही शहा म्हणाले. तसेच यावेळी शहा यांनी गॅस कोणी दिला, शौचालय कोणी दिले हे घरोघरी जाऊन सांगा. आजच्या सारखे १०० मेळावे होणार असल्याचेही सांगितले. बॅनर गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्राविना... नांदेड, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद अर्थात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा लातूरला झाला. परंतु, मराठवाड्यातील दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्रा विनाच शहरातील बॅनर आणि होर्डिंग्ज झळकत होते. मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी दबक्या आवाजात याबद्दल नाराजी व्यक्त केली. .

Leave A Comment