Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

उन्नत भारत अभियानात योगदान पुसदकर महाविद्यालयाचे यावली शहीदला शिबिर

अमरावती: स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयातर्फे यावली शहीद येथे विशेष शिबिर सुरु असून, राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थ्यांकडून योगदान देण्यात येत आहे, असे प्रा. राजेश ब्राम्हणे यांनी सांगितले. शिबिरातील दुपारच्या बौद्धिक सत्रात ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ. पंकज मोरे, महिला कार्यक्रम अधिकारी शीतल तायवाडे आदी यावेळी उपस्थित होते. शिबिरात श्री. पवार यांचे ‘युवक आणि शासन’ या विषयावर व्याख्यान झाले. भारताच्या लोकसंख्येत आजमितीला तरूणांची संख्या मोठी असून, पुढील दशकात ती पन्नास टक्क्यांवर जाणार आहे. तरुणाईच्या या ऊर्जेचा व नव्या संकल्पना, आविष्कारशक्तीचा देशाच्या प्रगतीसाठी वापर करुन घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. युवकांसाठीच्या काही उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. शिबिरात ग्रामस्वच्छता, आरोग्य तपासणी, श्रमदान, जलव्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती करण्यात येत असल्याचे श्री. मोरे यांनी यावेळी सांगितले. सुरेखा काळकर यांनी सूत्रसंचालन केले. मीनल शेळके यांनी आभार मानले.

Leave A Comment