Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

सीएम क्रीडा चषक उपक्रमातून नवा महाराष्ट्र घडेल - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

अमरावती: तरुणाईला ऊर्जा देणा-या सीएम क्रीडा चषक या उपक्रमातून नवा महाराष्ट्र घडेल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील आज येथे सांगितले. संत ज्ञानेश्वर सभागृहात सीएम क्रीडा चषकाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आमदार डॉ. सुनील देशमुख, आ. रामदास आंबटकर, आ. योगेश टिळेकर, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती विवेक कलोती, जयंत डेहणकर, शिवराय कुलकर्णी, किरण पातुकर, नीलेश देशमुख, हरिश साऊरकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतुन सुरु झालेला हा उपक्रम तरुणाईला विधायक कार्याकडे वळविणारा आहे. क्रीडा आणि कौशल्य विकासाची मोठी संधी या उपक्रमातून निर्माण झाली आहे. आ. डॉ. देशमुख म्हणाले की, सोशल मिडीयावर गुंतून राहिलेल्या तरुणाईला मैदानावर आणण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. टिळेकर म्हणाले. श्री. आंबटकर, श्री. कलोती, श्री. डेहणकर यांनी हे मनोगत व्यक्त केले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. क्रीडा मार्गदर्शक एम. टी. देशमुख, विजय वैद्य, तुषार शेळके, दिलीप इंगोले, हनुमंत लुगे, मंगेश चांदूरकर, स्वाती बाळापुरे, पायल अजमिरे, क्रीडा मार्गदर्शक व कुस्ती प्रशिक्षक रणविरसिंह राहल, सांजली वानखडे, राधीका कडू, पूजा कोसे, शेखर ढवळे, तेजस्विनी दहिकर, नितीन नवाते, कौस्तुक बेणकर आदींना यावेळी गौरविण्यात आले. नाळ चित्रपटातील कलावंत संकेत ईटनकर याचाही यावेळी सत्कार झाला

Leave A Comment