Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा
  • मल्ल्याच्या प्रत्यार्पणास लंडन कोर्टाची मंजुरी
  • उर्जित पटेल के बाद शक्तिकांत दास बने रिजर्व बैंक ऑफ इंडिया के नए गवर्नर

नाशिक जिल्ह्यात आजवर ७५ शेतकऱ्यांची आत्महत्या

नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील शेतक-याने आत्महत्या केली असून, जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत ७५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव त्या खालोखाल निफाड व बागलाण तालुक्यांत झाल्या आहेत.जिल्ह्यात चालू वर्षी शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. रविवारी रात्री बागलाण तालुक्यातील देवळाणे येथील कौतिक बाबूराव अहिरे या ५० वर्षीय शेतक-याने आत्महत्या केली. त्याच्या पत्नीच्या नावे शेतजमीन असून, त्याच्यावर सोसायटीचे बोझा असल्यामुळे कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजवर ७५ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मालेगाव तालुक्यात झाल्या आहेत. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या संपन्न मानल्या गेलेल्या निफाड तालुक्यातही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने कर्जबाजारी शेतक-यांचे सरसकट दीड लाख रुपयांचे कर्जमाफ केल्याने शेतकरी आत्महत्येत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही आत्महत्येचे प्रमाण कायम आहे.

Leave A Comment