Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

शहरातील झेप मल्टिपर्पज फॉउंडेशन वतीने गणपती उत्सवात गोळा केलेले साहित्य तिवसा येथील मतिमंद विद्यार्थ्यांना वाटप

शहरातील झेप मल्टिपर्पज फॉउंडेशन वतीने गणपती उत्सवात गोळा केलेले साहित्य तिवसा येथील मतिमंद विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलाय. या विद्यार्थ्यांना मिठाई सुद्धा वाटप करण्यात आली झेप मल्टीपर्पज फाऊंडेशन, अमरावती तर्फे गेल्या गणेश उत्सवादरम्यान संकल्पना – एक हाथ मदतीचा – श्रींच्या चरणी वाहू एक वही,एक पेन व दैनंदिन साहित्य हा उपक्रम राबवून नागरिकांना अनाथ, अपंग, गरजू चिमुकल्यांच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. श्री आशिष तिवारी सर,तिवसा यांच्या पुढाकाराने तिवसा येथे देखील हा उपक्रम राबविण्यात आला. येथील गणेश मंडळांनी व नागरिकांनी या उपक्रमासाठी सढळ हाताने सहकार्य केली. जमा झालेली सर्व मदत ( वह्या, पेन, पेन्सिल्स, ई) मतिमंद शाळा, तिवसा येथील चिमुकल्यांना वितरित करण्यात आली. सुमित डोरले, अमरावती यांच्या तर्फे मुलांना स्वीटस देण्यात आले. यावेळी झेप संस्थेच्या अध्यक्षा कोमल ताई राऊत, सचिव प्रविण रुद्रकार, सुजाता ताई निंभोरकर, कल्याणी ताई बेहाडे, सिमरन ताई सावरकर, अक्षय शिंदे तसेच १. आशिष दादा कोहळे (अध्यक्ष – समता गणेशोत्सव मंडळ, तिवसा), भाई सोनोने (सचिव – समता गणेशोत्सव मंडळ, तिवसा) २. श्यामभाऊ देशमुख (अध्यक्ष – विदर्भ गणेशोत्सव मंडळ, तिवसा) ३. उमेश दादा डहाके (अध्यक्ष बाल गणेशोत्सव मंडळ, तिवसा), वैभव दादा इसार (बाल गणेशोत्सव मंडळ, तिवसा) ४. शरद दादा तिजारे (अध्यक्ष – त्रिमूर्ती गणेशोत्सव मंडळ, तिवसा) ५. गोपाल दादा लोणारे (अध्यक्ष श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ, तिवसा) ६. भोजराज दादा गंधे (अध्यक्ष होळकर गणेशोत्सव मंडळ, तिवसा) व सौ. कांचन ताई तिवारी, हेमंत दादा निखाळे, विनोद दादा पटेल, आशिष दादा पंचारिया, सुरज दादा दहाट, श्रीकांत दादा पकोळे, प्रमोद दादा बोराळकर इत्यादींनी विशेष सहकार्य केले. संस्थेच्या वतीने धन्यवाद पत्र व तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले.

Leave A Comment