Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

जलद नाहीतर बंद पडणारी बससेवा

बस रॅपीड ट्रान्सपाेर्ट अर्थात बीअारटी बससेवा ही उपनगरातील नागरिकांना जलद प्रवास करता यावा यासाठी खरंतर सुरु केली गेली. प्रथम स्वारगेट ते कात्रज या मार्गावर बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली. त्यात अनेक त्रृटी हाेत्या. त्यानंतर संगमवाडी ते विश्रांतवाडी तसेच येरवडा ते वाघाेली या मार्गावरही बीअारटी सेवा सुरु करण्यात अाली. सध्या या सेवेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र असून सातत्याने बीअारटी मार्गात बसेस बंद पडत असल्याने जलद नाहीतर बंद पडणारी बससेवेचा अनुभव पुणेकरांना येत अाहे. याेग्य प्रकारे देखभाल हाेत नसल्याने पीएमपीच्या बसेस मार्गावर सातत्याने बंद पडत अाहेत. साेमवारी संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गात दुपारी बाराच्या सुमारास तीन बसेस बंद पडल्या हाेत्या. या अाधीही अनेकवेळा या मार्गात सातत्याने बस बंद पडत असल्याचे समाेर अाले अाहे. बंद पडलेल्या बसेस या बराच वेळ त्याच ठिकाणी उभ्या असतात. अचानक बसेस मार्गात बंद पडत असल्याने नागरिकांचा चांगलाच खाेळंबा हाेताे. कामावर जाण्यास उशीर हाेत असल्याने अनेकांना हाफ डे लागताे. बीअारटी बसने लवकर कामावर पाेहचता येईल या अाशेने या बससेवेचा वापर करणाऱ्यांची सातत्याने बस बंद पडत असल्याने निराशा हाेत अाहे. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करण्यासशिवाय त्यांना पर्याय उरत नाही. त्यातच पीएमपीच्या अनेक बसेसची अवस्था बिकट झाली असल्याचे चित्र अाहे. तुटलेल्या, माेडक्या बसेस रस्त्यावर उतरवल्या जात असल्याने त्या मार्गावरच बंद पडत असतात. बीअारटी बसथांब्यांची अवस्था सुद्धा बिकट झाली अाहे. स्वयंचलित दरवाजे काम करीत नसल्याने बस अाल्यानंतर एखादा अपघात घडण्याची शक्यता अाहे. त्याचबराेबर या बसथांब्यांमध्ये सर्वत्र अस्वच्छता पसरली अाहे. अनेक बसमधील जीपीएस यंत्रणा काम करत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे कुठली बस बसथांब्यांवर येत अाहे याची माहिती प्रवाशांना मिळत नाही.

Leave A Comment