Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

विदर्भाच्या शेतकरी विधवा नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ रस्त्यावर :तनुश्री दत्ता यांच्या प्रतिमा जाळून निषेध

मागील अनेक दिवसापासून विदर्भ व मराठवाड्यातील हजारो शेतकरी विधवांना वडिलांचा व भावाच्या रूपाने एका दशकापासून आर्थिक मदत देऊन पुनर्वसन करणाऱ्या सिने जगतातील प्रसिद्ध नटसम्राट नाना पाटेकरांनी २००८ च्या घटनेची री ओढत सुरु असलेली बदनामीच्या विरोधात आज विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या शेकडो विधवा शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्हातील पांढरकवडा येथे निदर्शन करीत रस्त्यावर उतरल्या असुन आमच्या नानभाउची बदनामी बंद करा अशी घोषणा देत नाना पाटेकरांवर फक्त फुकट प्रसिद्धीसाठी आरोप लावणाऱ्या तथाकथित आयटम डान्सर तनुश्री दत्ता यांच्या प्रतिमेची होळी केली . यावेळी के बी सी फेम शेतकरी विधवा अपर्णा मालीकर यांनी आपल्या भावना प्रगट करतांना म्हटले की आम्ही हजारो शेतकरी विधवा अत्यंत अडचणीत असतांना नाना पाटेकरांनी मदतीचा हात दिला ,विदर्भ मराठवाड्यात आमच्या दारावर येऊन वडीलांचा तर मोठ्या भावाचा आधार दिला .आज हजारो अनाथ शेतकरी विधवांचे पुनर्वसन करणाऱ्या आमच्या भावाची होत असलेली खोटी आंणी बिनबुडाच्या घटनेवर आधारीत बदनामी आम्हला व्यथित करीत आहे व आयटम डान्सर तनुश्री दत्ता ही बदनामी बंद करावी व नाना पाटेकरांची माफी मागावी अशी मागणी केली आहे . या निदर्शन आंदोलनात शेतकरी विधवा भारती पवार अंजूबाई भुसारी गीता राठोड वंदना गावंडे अर्चना राऊत कवीता सिडाम रंजना खडसे कमल सुरपाम उमा जिड्डेवार शीलामांडवगडे चंद्रकला मेश्राम पौर्णिमा पोकुलवार बबिता आगरकर ज्योती जिड्डेवार रमा ठमके वंदना शेंडे रंजना गुरनुले सह शेकडो शेतकरी विधवा शामिल होत्या . शेतकरी विधवा संघटनेच्या भारती पवार यांनी जर नाना पाटेकरांनी होत असलेली बदनामी बंद करण्यात आली नाहीतर विदर्भ मराठवाड्यातील हजारो नाना पाटेकरांच्या भगीनी मुंबईला नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ पोहचतील व तनुश्री दत्ता यांना जाब विचारतील असा इशारा यावेळी दिला .

Leave A Comment