Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आंबेनळी घाटातून अपघातग्रस्त बस बाहेर काढली

महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटात २ महिन्यापूर्वी दापोली विद्यापीठाची सहलीला जाणारी कर्मचाऱ्यांची बस खोल दरीत कोसळली होती. यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला होता. ही बस शनिवारी काढण्यात आली. यामुळे आता अपघाताची सर्व माहिती मिळणार आहे. दाभीळ गावच्या हद्दीत २८ जुलै २०१८ रोजी घडला होता. आंबेनळी घाटातील दरीमध्ये सुमारे पाचशे ते सहाशे फूट खाली कोसळून अपघात झाला होता. या अपघातामध्ये एकूण तीस प्रवाशी मृत झाले होते. बस खोल दरीमध्ये होती त्यामुळे अपघाताचे निश्चित कारण समजण्याकरता अपघातग्रस्त बसची तपासणी करण्यासाठी ही बस दरीतून काढण्यात आली. बसवर काढण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. यासाठी दोन क्रेनचा वापर करण्यात आला. या कामासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी मोलाची कामगिरी बजावली. दरम्यान, घटनास्थळी मृत व्यक्तीच्या नातेवाईक उपस्थित होते. या घटनेच्या ३ महिन्यानंतर ही नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. यावेळी नातेवाईकांनी संबंधित घटना उघडकीस आणण्यासाठी सीबीआय चौकशी आणि नार्को टेस्टची मागणी केली. या अपघातातून बचावलेल्या सावंत देसाई यांनीच हा अपघात घडवल्याचा आरोप नातेवाईकांनी यावेळी केला

Leave A Comment