Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

सोलापूरात औषध विक्रेत्यांचा संप, अडीच हजार मेडिकल दुकाने बंद

औषधाच्या आॅनलाइन विक्री ई - फार्मसीजच्या निषेधार्थ सोलापूरातील औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय संप पुकारला आहे़ या संपामुळे शहर व जिल्ह्यातील अडीच हजार मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी पार्क चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा पार्क चौकमार्गे सिध्देश्वर मंदीर- मार्केट पोलीस चौक - सिध्देश्वर प्रशाला - जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला़ यावेळी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मेडीकल विक्रेत्यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले़ या मोर्चात शेकडो मेडिकल दुकानदार सहभागी झाले होते़

Leave A Comment