Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

भूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख

अमरावती : शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी संरक्षित सिंचन अत्यंत महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सिंचन प्रकल्प सहाय्यभूत ठरते. प्रकल्पाची गरज व त्याअनुषंगाने निर्माण होणारा पाणीसाठा या महत्वपूर्ण बाबी पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून भरीव निधी दिला जातो. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पुर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या अनुषंगाने भूसंपादन व पुनर्वसनाची कामे संबंधित यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील सिंचन अनुशेष, अनुशेषाव्यतिरिक्त प्रकल्पाचे भूसंपादन आणि पुनर्वसनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी अमरावती, बुलडाणा, वाशिम अनुक्रमे अभिजित बांगर, निरुपमा डांगे, लक्ष्मीनारायण मिश्रा, महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ना. डॉ. देशमुख म्हणाले, अमरावती विभागात एकूण 124 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी संपादीत होणाऱ्या 22 हजार 175 हेक्टर जमिनीपैकी 9 हजार 894 हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनाचे कार्य संयुक्त मोजणीद्वारे संबंधीत शासकीय यंत्रणेनी समन्वयातून करावे. जमिनीच्या मोबदल्यासह प्रकल्पबाधित नागरिकांचे पुनर्वसन आणि पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या बारचार्टनुसार सर्व संबंधीत यंत्रणांनी पाठपुरावा करावा. मे 2019 पर्यंत सर्वच अपूर्ण प्रकल्प पूर्ण होऊन घळभरणी होईल यादृ्ष्टीने कामांचे काटेकोर नियोजन करावे. प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पर्यायी जागेवर किंवा गावठाण जमिनीवर पुनर्वसन करावे. पुनर्वसित क्षेत्रात पिण्याचे पाणी, विद्युतीकरणाची कामे, वाहतुकीसाठी रस्ते आदी मुलभूत सुविधा तातडीने पुरवाव्यात. प्रकल्पांच्या कामांबाबतचा तक्ता तयार करुन महामंडळास सादर करावा, तसेच ज्याठिकाणी पाणीसाठा निर्माण झाला आहे, त्याठिकाणी बंद पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. बैठकीत चर्चा केलेल्या प्रकल्पांची कामे उत्कृष्ठ नियोजनातून पूर्ण करावीत, असेही डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यातील जिगांव, राहेरा, खडकपूर्णा, निम्न ज्ञानगंगा, बोराखेडी या पुनर्वसन असलेल्या प्रकल्प तसेच पुनर्वसन नसलेल्या आठ प्रकल्प अशा एकूण तेरा प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत डॉ. देशमुख यांनी माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री यांचे वॉररुममध्ये समाविष्ठ जिगांव प्रकल्पबाधित सतरा गावांचे तातडीने पूनवर्सन करुन त्याठिकाणी नागरी सुविधा पुरविण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. प्रधानमंत्री बळीराजा जलसंजीवनी योजना व मुख्यमंत्री यांचे वॉररुममध्ये समाविष्ठ असलेल्या अकोला जिल्ह्यातील वाई सं., शहापूर व अन्य बारा प्रकल्प असे एकूण चौदा प्रकल्प तसेच वाशिम जिल्ह्यातील 48 प्रकल्प, अमरावतीचे 33 प्रकल्प, यवतमाळचे 16 प्रकल्पा संदर्भात भुसंपादन व पुनवर्सनच्या सद्यस्थिती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविल्या. विभागातील सर्वच प्रकल्पांची घळभरणी 2019 पर्यंत होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करुन प्रकल्प पूर्णत्वास आणावेत, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी बैठकीत दिल्या. आढावा बैठकीला विभागातील वरिष्ठ महसूल अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, भुमी अभिलेख, नगररचना, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Comment