Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अवैध सावकारीचा फरार आरोपी अटकेत

अवैध सावकारी प्रकरणातील फरार आरोपीस मेहकर पोलिसांनी अखेर ठोकल्या बेडय़ा न्यायालयानं केली पोलीस कष्टडिट रवानगी महाराष्ट्र्रतून ग्रामीण भागातील आज पर्यंत सर्वात मोठी बातमी . बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मधे अवैध सावकारीचे प्रकरण समोरा आलेले आहे. यामधे जानेवारी 2018 पासुन फरार आरोपी सुनील माणिकराव तिफने यास बावधन पुणे येथे पकडन्यास मेहकर पोलिसांना यश मिळालेले आहे. मेहकरचे तक्रारकर्ते संजय उत्तमराव पाचारने यांनी जानेवारी महिन्यात अवैध सावकार सुनील माणिकराव तिफने यांच्या कडून दुकानासाठी सहा लाख रुपये शेकडा पाच रुपये व्याजाने घेतले होते, 13 ते 14 महिन्यात परतफेड कारित त्यांनी तिफने यास जवळपास 13 लाख 50 हजार रुपये परत दिल्यावरहि आरोपी तिफने याकडून 25 लाखाची मांगनी होत असल्याचे ते म्हणाले. पैसे न दिल्यास घर,दुकान ताब्यात घेऊन जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचे तक्रारकर्ते बोलले.. संजय पाचारने यांनी जिल्हा निबंधक बुलढाणा यांच्या कड़े रितसर तक्रार दिल्यावर DDR बुलढाणा यांनी मेहकर चे पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या कड़े लेखी तक्रार दिल्याचे बोलले जात आहे, यावरून अवैध सावकारी बाबत पोलिस स्टेशन मेहकर यांचेकडुन दिनांक 09/09/2018 रोजी फरार आरोपी सुनील माणिकराव तिफने यास अटक करुण भा.दं.वी. चे कलम 384, 385, 467, 468, 471 420 व कलम 39 सावकारी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनांक 15/09/2017 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, जिल्हा निबंधक व पोलिसांनी केलेल्या सामूहिक करवाई मधे आरोपिच्या घरून जवळपास 700 संशयास्पद कागड़पत्र आढळून आले आहे.आणि आरोपी हा कमी शिक्षित जरी असला तरी या भागात त्याने अवैधरित्या व्यवहार करुण गरीब, गरजू व शेतकऱ्यांच्या मस्तकी चक्रिवाढ व्याजचे वजन टाकून लुटल्याचे समोर येत आहे. संजय पाचारने यांच्या तक्रारी नंतर बरेच लोक अवैध सावकार सुनील तिफने याच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे आले आहे. आज न्यायलया समोर त्यास पुन्हा उभे करण्यात आले असता 15 ता .पर्यंत पोलीस कष्टडि देण्यात आले असून पुढील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकरी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शणाखाली दिगंबर चव्हाण त्यांचे सहकारी करत आहे..

Leave A Comment