Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

श्रीं’चा आज पुण्यतिथी सोहळा

शेगाव येथे श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळय़ाला श्री गणेश याग व वरुण यागाने प्रारंभ झाला. या सोहळ्य़ातील मुख्य पुण्यतिथी कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजीपर पडले. या मधे सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान झाले. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय संचालक नीलकंठ पाटील यांच्या हस्ते दु.२ वाजता श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन झाल्यानंत श्रींह्णची पालखी रथ, मेणा, गज अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघाली. श्री गजानन महाराज मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री गजानन चित्र मंदिर, जुने महादेव मंदिर, शीतलनाथ महाराज धर्मशाळा, माळीपुरा, प्रगटस्थळ येथे श्रीची प्रगटस्थळी पूजा व त्यानंतर. गढीजवळून डॉ. तायडे यांचा दवाखाना, बाजार रोडने बसस्टँड, मुख्य रोडवरून शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, भक्तनिवास येथून श्रींच्या मंदिरात संध्याकाळी दाखल झाली.यावेळी संस्थानच्या वतीने श्रींची आरती ने सांगता करण्यात आली. श्रींच्या मंदिरात गर्दी लक्षात घेता भक्तांच्या पादत्राणे ठेवण्याची वेगळी व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नागपूर येथील श्री गजानन भक्त मंडळाने मंदिरासमोर पादत्राणे ठेवण्यासासाठी विनामूल्य व्यवस्थासुद्धा होती. श्री गजानन भक्तांसाठी श्री अग्रसेन भवन येथे 13 व 14 सप्टेंबर असे दोन दिवस महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. मंदिरात दर्शनासाठी एकेरी मार्गाची व्यवस्था केली आहे. दर्शन लवकर व्हावे यासाठी श्रींच्या भक्तांना श्रींचे कळसदर्शन, मुख्य दर्शन व समाधी दर्शन घेता येणार आहे. भक्तांच्या सेवेसाठी कर्मचारी, सेवाधारी वर्ग तत्पर होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून लाखांवर भाविक शेगावात दाखल झालेले आहेत. विदर्भातील सर्वांत मोठा उत्सव असल्याने शासकीय यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. तर पोलिसांचा कडा पहारा शेगावी दिसून येत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईत न्हाऊन निघतो आहे.

Leave A Comment