Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

कुंपणच खातंयशेत

गुरुजन हे नेहमीच वंदनीय मानले गेले आहेत. आचार्य देवो भव असं भारतीय संस्कृती शिकविते परंतु शिक्षकांच्या वर्तवणुकीवरच प्रश्नचिन्ह लागताहेत. भातकुली येथील राठी विद्यालयातील सुरेश तुळशीरामजी ठाकूर या शिक्षकाने विद्यर्थिनीशी अशोभनीय कृत्य केलं. या आरोपीला १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार करताच शिक्षक फरार झाला. तो नागपूर येथे जामीन मिळविण्यासाठी गेला असता, भातकुली पोलिसांनी अटक केली. ३५४ कालमानवये व पॉस्को अंतर्गत सुरेश ठाकूर वर गुन्हे दाखल केले आहे. १३ सप्टेंबरला त्याला न्यायालयात हजर केलं नंतर आरोपीची प्रकृती बिघडली. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे शिवसेनेचे पदाधिकारी आरोपीच्या भेटीसाठी आले. शिक्षकाची प्रकृती बिघडली हे खरं असेल तरी हा गंभीर प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याची पाठराखण करण्याकरिता हे शिवसैनिक तेथे गेले होते का असा प्रश्न केला जातोय.

Leave A Comment