Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गणेश स्थापना से पूर्व फ्रेजरपुरा मे दो गुटों में झगड़ा तनाव निर्माण

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद सोहळा शहरभरात सुरु असताना या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सार्वजनिक मंडळाची मिरवणूक जात असताना जुन्या वादावरून फ्रेजरपुरा लायब्ररी चौकात गणपती शोभायात्रे दरम्यान २ गटात वाद होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ९:३० वाजता दरम्यान घडली. शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाची शोभायात्रा येत असताना दुसऱ्या गटातील व्यक्तीने फिर्यादी रोहित शांताराम गोर्ले यांच्याशी वाद घातला. यात त्याला लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. त्याच्या तक्रारीवरून दुसऱ्या गटातील ३ युवकांविरुद्ध कलम ३२३,५०४ कलमानवये गुन्हा दाखल केलाय. तर दुसऱ्या गटातील फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून त्या दवाखान्यातून घरी जात असताना दोन गटात भांडण होत असताना महिलेनं हटकले. यावर तिला शिवीगाळ करण्यात आली. तिघांविरुद्ध ५०४ ५०६ कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला. १ गटातील तिघे तर दुसऱ्या गटातील एकाच्या भावाला अशा ४ जणांना फ्रेजरपूरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फ्रेजरपुरा पोलिसांना याबाबत विचारलं असता दगडफेक झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र या दगडफेकीत होमगार्डचे जवान जखमी झाले. सार्वजनिक मंडळानजीक पोलीस कॉन्स्टेबल बरगळ व होमगार्ड जवान अरविंद काळे तैनात होते. काही अंतरावरच दगडफेक होत असल्याचं माहिती होताच दोघेही धावत गेले असता, दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरु होती त्यामध्ये अरविंद काळे यांच्या पायाला दगड लागून ते जखमी झाले. मात्र त्याची माहिती होमगार्डला नव्हती त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा झाली नाही. घटनास्थळी पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, डीसीपी, एसीपी, पीआय दाखल झाले क्यूआरटी पथक येथे तैनात करण्यात आल. कर्फ्यू सदृश परिस्थिती येथे निर्माण झाली.

Leave A Comment