Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

विवाहचे आमिष देवून युवतीचे शारीरिक शोषण

सोशल साईट वरून झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर विवाहाचं आमिष दाखवून ३ वर्ष शारीरिक शोषण करणाऱ्याला गाडगे नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी २३ वर्षीय अंकुश सुधाकर हागोने असं त्याच नाव असून अचलपूर तालुक्यातील सिंधी पथरोट येथील तो रहिवासी आहे. गाडगे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलनीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये तिला अनेकदा बोलवलं व तीच शारीरिक शोषण केलं. विवाहाला नकार दिल्याने युवतीने गाडगे नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३७६ कलमानवये गुन्हा दाखल करून अंकुश हागोनेला अटक केली आहे. आरोपी हा हॉली बॉल पटू असून त्याने कलरकोट मिळवला आहे. तो शहरात पोलीस भरती करीता आला होता तर युवतीहि पोलीस भरतीचा सराव करीत होती. गाडगे नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पी एस आय शुभांगी मयतकार रणजित गावंडे जहीर शेख विशाल वागपांजर यांनी कारवाई केली................

Leave A Comment