Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार, इंटरनेट सेवा बंद

बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती लष्‍कराला मिळाल्यानंतर सीआरपीएफ, राज्य पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. यानंतर ही चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर खबरदारी म्हणून बारामुल्ला जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्‍याबरोबरच शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्‍यान, बुधवारी सकाळी जम्मूमध्ये जवानांच्या एका पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर जम्मूमध्ये हाय अ‍ॅलर्ट लागू करण्यात आला आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील महत्त्वांच्या आणि संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. विशेष करून जम्मू परिसर आणि जम्मू ते श्रीनगर महामार्गावर ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर दहशतवाद्यांनी ट्रक घटनास्थळी सोडून तेथून पळ काढला.

Leave A Comment