Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जागृती आश्रमाचे मठाधिपती शंकर महाराज बेपत्ता

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून जवळच असलेल्या शेलोडी येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज रविवारी सकाळपासून बेपत्ता झालेत. त्यामुळे त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला असून आज सकाळ पासून आश्रमात अनुयायी गर्दी करीत आहेत. नापासांच्या आयुष्यात प्रेरणास्त्रोत निर्माण करणारे प.पू. शंकरजी महाराज आश्रमातील काहींच्या त्रासामुळे व्यथीत झाले होते. जागृती आश्रमाची जमिन, महाराजांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आणि व्यवहारावरून काही जणांकडून त्यांना हेतूपुरस्परपणे त्रास दिल्या जात होता. असा उल्लेख शंकर महाराजांनी लिहीलेल्या चिठ्ठीत केला आहे. आश्रमाशी संबंधित पाच जणांनी सत्कार्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळेच आपण खामगाव सोडत असल्याचेही महाराजांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. जागृतीमधील वाद विकापोला जात असल्याचे निदर्शनास येताच, शंकर महाराजांनी गेल्या वर्षभरापूर्वीच सजनपुरी परिसरात तपोवनाची निर्मिती केली होती. तेव्हापासूनच महाराज शेलोडी येथील आश्रमात जाण्याचे टाळत होते. परंतू, यावादावर तोडगा निघत नसल्याने व्यथीत झालेल्या महाराजांनी रविवारी तपोवन सोडले. आपला शोध न घेण्याची विनंतीही महाराजांनी चिठ्ठीत केली असून गेल्याकाही दिवसांपासून जागृतीमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जागृती आश्रमातील पदाधिकाºयांनी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून महाराज निघून गेल्याच्या वृत्ताला दुजारो देण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस तक्रारीसंदर्भात ‘तपोवन’ येथे बैठक सुरू होती. यासंदर्भात सोशल मिडीयावर देखील पोस्ट व्हायरल झाली असून, अनुयांकडून महाराजांचा शोध घेण्यात येत आहे. काही भाविक रात्रीच तपोवन येथे दाखल झाले असून, महाराज सुखरूप परत यावेत, यासाठी ‘तपोवन’ात हनुमान चालीसा पठण आणि सामुहिक प्रार्थना केली जात आहे. : शंकर महाराज तपोवनातून निघून गेल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. महाराजांनी तपोवन सोडण्यापूर्वी एका विश्वासू सेवेकºयांकडे एक चिठ्ठी सोपविली होती. ही चिठ्ठी सोमवारी सकाळी १० वाजता वाचावी, अशी आज्ञा शंकर महाराजांनी केली होती. मात्र, धक्कादायक बाबीमुळे या चिठ्ठीचे रात्री वाचन करण्यात आले. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

Leave A Comment