Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

शिंगनवाड़ी ते कळाशी रस्त्यांची दुरावस्था गावातील नागरिक करणार जनआंदोलन

दर्यापुर तालुक्यातील शिंगणवाड़ी,कळाशी च्या शेतशिवारांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यांची अतिशय भयावद अवस्था झालेली दिसत आहे या साठी शेतकऱ्यांची फरफट होत असून आता पावसाळा सुरु असल्याने जवळ शेतकरयाणा आपल्या शेतात जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून सध्या शेतकरयांचे पिके शेतात असल्यामुळे येथील शेतकरी चिंतेत पडलेला आहे. पांदण रस्ते ३१ मे पूर्वी मोकळे करुन देण्याचे शासनाचे धोरण होते . मागणी आली की लगेच कामाला प्राधान्य देऊन रस्ते मोकळे करून देण्याचे आदेश सुद्धा होते . मात्र दर्यापुर तालुक्यातिल रस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची फरफट होत आहे. तालुक्यातील असे कित्येक पांदण रस्त्यांची मागणी धूळ खात पडून आहे. पांदण रस्त्यांबाबत शासन आग्रही असताना स्थानिक प्रशासन कामच करायला तयार नाही. अनेक पांदण रस्ते मोजणीचे प्रस्ताव तालुका भूमी अभिलेख कार्यालयात तसेच पडून आहे. याच प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: दखल घेऊन रस्त्याचे तत्काळ मोजमाप करण्याचे आदेश दिले होते . परंतु दर्यापुर प्रशाषनाला अजुन वेळ मिळाला नाही. तालुक्यातील पांदण रस्त्याचे काम रखडले आहे. पांदण रस्ते मोकळे करुन देण्यासाठी अनेक शेतकरी तहसील कार्यालयावर आंदोलने मोर्चे काढले परंतु अद्यापही सकारात्मक निर्णय शाशन घेत नसल्याने येत्या 2 आक्टोम्बर ला शिंगनवाडी येतील नागरिक दर्यापुर तहसील कार्यलवर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी विदर्भ मीडियाशी बोलताना सांगितले

Leave A Comment