Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

राजापूरजवळ भीषण अपघातात ६ जण ठार; ३ गंभीर

मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील वाकेड गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण जागीच ठार झाले असून २ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजापूरनजीक महामार्गावर खाजगी बस आणि कारची धडक झाली. सकाळी ११च्या सुमारास हा अपघात झाला. यात ८ पैकी ५ जण जागीच ठार झाले तर ३ जण गंभीर जखमी झाले होते त्यातील एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. कोंडे येथील रहिवाशी मुंबईहून सिंधूदुर्गकडे जात असल्याचे समजते. या अपघातातील जखमींना रत्नागिरीतील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यातील दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्यात येत आहे.

Leave A Comment