Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

भीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ

अमरावती: भीमटेकडीचा परिसर रम्य आणि प्रेरणादायी असून, येथे सौंदर्यीकरणासह इतरही सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी प्रस्ताव द्यावा. शासनाकडून दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज येथे केली. भीमटेकडी परिसर सौंदर्यीकरण व विविध विकासकामांचा शुभारंभ करताना भीमटेकडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार रवी राणा यांच्यासह श्री. आकोडे, सपनाताई ठाकूर, आशिष गावंडे व बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. भीमटेकडी परिसरात 1957 मध्ये लोकवर्गणीतून बुद्धविहार साकारण्यात आले. अत्यंत प्रेरणादायी आणि सुंदर असा हा परिसर आहे. येथे इतरही सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे श्री. कांबळे यांनी सांगितले. सौंदर्यीकरणामुळे व सुविधांमुळे परिसराचा लौकिक वाढणार आहे. परिसरात आणखी रस्ते व इतर सुविधांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे श्री. राणा यांनी सांगितले. 17 कोटींची विकासकामे भीमटेकडी येथे 10 कोटी रुपये निधीतून भव्य प्रवेशद्वार, सिमेंट काँक्रिट रस्ता, यात्री निवास, वाचनालय, ध्यान केंद्र, स्वच्छतागृह व पेयजल व्यवस्था उभारण्यात येणार आहे. कल्याणनगर चौक- मोतीनगर- मुदलियारनगर- यशोदानगर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे दोन्ही बाजूंनी नाल्यासहित काम 7 कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Comment