Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

चांदुर बाजार येथील राज्य सरकारी कर्मचारी यांचा संपाचा दुसरा दिवस

संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 7 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या एकूण 17 लाख सरकारी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू असून त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसुन येते आहे.यातच चांदुर बाजार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळा मधील शिक्षक आणि कर्मचारी यांनी संप पुकारला असून जवळपास तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळा बंद असल्याचे चित्र आहे.तसेच संपावर गेलेल्या शिक्षक यांच्या मुळे विध्यार्थी यांचे कोठल्याच प्रकारचे नुकसान आम्ही होऊ देणार नसल्याचे भूमिका चांदुर बाजार येथील शिक्षक वर्ग यांनी घेतली आहे. या संप मध्ये चांदुर बाजार तहसिल कार्यलाय मधील महसूल विभाग,कृषी विभाग,पुरवठा विभाग सुद्धा सहभाग नोंदविला आहे.तसेच राज्य सरकार ने आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी तहसिल विभाग मधील कर्मचारी आणि शिक्षक यांच्या होते आहे.तर या संपमध्ये राज्य सरकार प्रति शिक्षक वर्गात मोठ्या प्रमाणावर चांदुर बाजार तालुक्यात रोष पाहायला मिळाला आहे.

Leave A Comment