Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून राज्यभर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरु आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. ९ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र बंदला संपूर्ण राज्यभरातून प्रतिसाद मिळावा यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर बैठकी घेण्यात आल्या असून उद्या महाराष्ट्र बंद राहणारच अशी बांधणी मोर्चेकर्यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा उद्याच्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात यावा तसेच मराठा मुस्लीम आणि धनगर समाज सुद्धा उद्याच्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याने बुलडाणा जिल्हा समन्वयकांनी सांगितले . बंद दरम्यान कोणतीही हिंसा करू नका परंतु संपूर्ण समाज हा बंदमध्ये सामील व्हावा अशा प्रकारची माहितीसुद्धा बुलडाणा जिल्हा सकल मराठा समाजाकडून देण्यात आली आहे. 

Leave A Comment