Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

शेगावच्या स्पोर्टिंग क्लब वर पोलिसांचा पुन्हा छापा एक लाख 64 हजाराचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत स्पोर्टिंग क्लब च्या नावावर चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पंधरा दिवसांपूर्वी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे यांच्या पथकाने धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता याच स्पोर्टिंग क्लब मंगळवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून 14 आरोपींना ताब्यात घेतले असून एक लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शेगाव शहर बाहेरील ओंकार स्पोर्टिंग क्लब या मनोरंजन केंद्रामध्ये पैशाच्या हार-जीत वर जुगार अड्डा चालवल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरून सोमवारी रात्री या स्पोर्टिंग क्लब पोलिसांनी धाड टाकली यावेळी या स्पोर्टिंग क्लब मध्ये पैशाच्या हार्दिक पत्ते खेळत खेळल्या जात असल्याची निर्दशनास आले यावेळी पोलिसांनी स्पोर्टिंग क्लब चा मालक प्रमोद सुळ सह 14 जणांना ताब्यात घेतले असून 41 हजार रुपये रोख व मुद्देमाल असा एकूण एक लाख 64 हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला सोमवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत सहा तास ही कारवाई चालली यातील सर्व आरोपींना शहर पोलीस स्टेशनला आणून त्यांचे वृद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख पोहे का विकास खांजोडे लक्ष्मण कटक आताऊल्ला खान भारत जंगले केदार फाळके श्रीकांत चिंचोले विजय मुंडे यांनी यशस्वी केली.

Leave A Comment