Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मदर डेअरी कडून माजी सैनिकांसाठी शहरात दुधविक्री केंद्रासाठी सहकार्य

अमरावती, दि. 27 : विदर्भ- मराठवाड्यासारख्या अर्वषणग्रस्त भागात दुग्धोत्पादन वाढून दुग्धजन्य पदार्थांचा फायदेशीर व्यवसाय दूध उत्पादक व शेतक-यांना करता यावा, यासाठी राज्य शासनाने अनेकविध योजना अंमलात आणल्या आहेत, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले. मदर डेअरी व नॅशलन डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने येथील तखतमल शाळेजवळ मिल्क बुथ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बोर्डाकडून हे केंद्र माजी सैनिकाला प्रदान करण्यात आले आहे. दुग्धोत्पादनासारखा पूरक व्यवसाय शेतक-यांसाठी संजीवनी ठरतो. हे लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून राज्याला पूरक व्यवसायासाठी राज्याला निधी व अनेक योजनांना चालना मिळाली आहे, असे श्री. पोटे पाटील यांनी सांगितले. माजी सैनिकांसाठी 28 बुथ मदर डेअरी व बोर्डाकडून माजी सैनिकांना अमरावती शहरात दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यासाठी 28 बूथ उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचा माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave A Comment