Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

पालकमंत्र्यांकडून पर्यटन कामांचा आढावा पर्यटन विकासकामांना गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

अमरावती, दि. 27 : जिल्ह्यात पर्यटन विकासाची शक्यता लक्षात घेऊन अनेकविध कामांना शासनाने मंजूरी दिली आहे. ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पर्यटन व विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार, जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील संतभूमी, ऐतिहासिक स्थळे, वनसंपदा लक्षात घेऊन रिद्धपूर पर्यटन विकास, संगमेश्वर विकास, मुसळखेड येथील यशवंत महाराज संस्थान, श्रीक्षेत्र बहिरम, मालखेड निसर्ग पर्यटन केंद्र, मोर्शी येथील निसर्ग पर्यटन केंद्र, लोणी येथील संत गुलाबराव महाराज जन्म मंदिर व पालखी मार्ग, प्रल्हादपूर येथील भक्तीधाम, अमरावतीतील भीमटेकडी सौंदर्यीकरण अशा अनेक कामांना शासनाने निधी मंजूर केला आहे. काही कामे पूर्णत्वास जात आहेत. मात्र, विलंब होणा-या कामांवर विशेष लक्ष देऊन ती पूर्ण करावी. कंत्राटदाराला आदेश दिल्यावरही कामांना गती मिळत नसेल तर तत्काळ त्याचे काम रद्द करावे.

Leave A Comment