Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी आ. रवि राणा यांच्यावर गुन्हा दाखल करा - खासदार आनंदराव अडसुळ

बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी आ. रवि राणा यांच्यावर गुन्हा दाखल करा - खासदार आनंदराव अडसुळ अमरावती दि. २६ : आमदार रवी राणा यांनी मी स्वतः खासदार आनंदराव अडसूळ व माझे स्वीय सहाय्यक श्री. सुनिल भालेराव यांनी घोटाळ्याच्या माध्यमातून जमवली कोट्यावधीची बेनामी मालमत्ता तसेच ९०० कोटीच्या घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रपती सचिवालयाचे लोकसभा अध्यक्ष प्रमुख सचिवांना लेखी पत्र देवून माझे सी.बी.आय. व ई.डी. यांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याबाबत खोटी व बदनामीकारक माहिती (१) ई-मेल (२) फेस बुक (३) इन्स्ट्राग्राम (४) ट्विटर या सोशल अकाउंट तसेच (५) स्थानिक अमरावती येथील दि. २५.०७.२०१८ ची स्थानिक वर्तमानपत्रात व (६) स्थानिक अमरावती येथील अनेक इलेक्ट्रॉनिक मिडीया मधुन प्रसारीत करणाऱ्यांविरुद्ध माझी फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची कलम १५४ सी.आर.पी.सी. प्रमाणे फिर्याद दाखल गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसेना महानगरप्रमुख प्रा. प्रशांत वानखडे यांचे नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मा. पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय मंडलीक यांना निवेदन दिले. त्यावेळी शिवसेनाशहरप्रमुख प्रविण हरमकर, उपशहरप्रमुख अमोल निस्ताने, पंजाबराव तायवाडे, नंदु काळे, पप्पु मुणोत, बाल्या चव्हाण, गोविंद दायमा, विजय खत्री, अक्षय चऱ्हाटे व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Comment