Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

विदर्भ काेंकण ग्रामीण बँकेला आग साडेतीन लाख रूपये जळून खाक; महत्त्वाचे दस्तएेवजही जळाले

अकाेला,ता. ११ : मलकापूर स्थित अंबिकानगर येथील विदर्भ काेंकण ग्रामीण बँकेला बुधवारी (ता.११) दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याने तब्बल साडेतीन लाख रूपये जळून खाक झालेत, तर काही महत्त्वाचे दस्तएेवजली जळाल्याची माहिती समाेर आली आहे. बुधवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसात मलकापूरातील विदर्भ काेंकण ग्रामीण बँकेच्या अंबिकानगर शाखेत बँकेचे दैनंदिन कामकाज सुरू हाेते. सर्वकाही नेहमी प्रमाणे सुरू असताना दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास अचानाक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे बँकेत एकच खळबळ उडाली. बँक अधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाची संपर्क साधला. अग्निशम विभागाच्या दलाने तत्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्यास सुरुवात केली. बाहेरून आग कमी दिसत असली, तरी आतुन मात्र आगीचे स्वरुप भीषण हाेते. अग्निशमन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग आटाेक्यात आली; मात्र आगीत तब्बल साडेतील लाख रूपयांची राेख रक्कम जळून खाक झाली. शिवाय, बँकेतील महत्त्वाचे दस्तएेवजही या आगीत स्वाहा झाल्याने बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आग लागण्याचे कारण स्पष्ट नाही बँकेला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. परंतु, घटनेचे नेमके कारण अद्याप समाेर आले नाही. आग विझवण्यासाठी दाेन गाड्या बँकेची आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाची पहिली गाडी ४.५० वाजताच्या सुमारास घटनास्थळी पाेहाेचली. आग आटाेक्यात न आल्याने, अग्निशमन विभागाने दुसरी गाडी पाठवली. यानंतर अग्निशमन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यास यश आले.

Leave A Comment