Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता विशेष दक्षता घेण्याचे निर्देश

आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता गाव व तालुका पातळीवरील अधिकारी- कर्मचा-यांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात काल सरासरी 26.26 आणि आज सरासरी 29.4 मिमि पावसाची नोंद झाली. पावसामुळे पूरपरिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना दक्षतेबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व इतर कर्मचा-यांनी गावातच हजर राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम येथील नाल्याला पूर आल्याने चार शिक्षक अडकले होते. त्यांना सुखरुप पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कोदोरीहरव या गावात नाल्याच्या पाण्याने काही झोपड्यांना वेढा घातला होता. तेथील सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

Leave A Comment