Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

एचजी इन्फ्रा कंपनीमुळे शेतकऱ्यांची पिके गेली खरडून.- भाजप युवा मोर्च्याच्या चक्काजाम आंदोलन

वरुड (अमरावती) :- राज्यात सर्वेकडे रस्त्याचे काम चालू असताना वरुड तालुक्यातील सुरळी – वाठोडा रस्त्यावरील बन परिसरात एच जी इन्फ्रा कंपनीचे पुलाचे काम सुरु आहे. बन परिसरात एच जी इन्फ्रा कंपनीकडून तयार करण्यात आलेला डायव्हर्शनमध्ये एका पायलीचा पूल कम रस्ता करण्यात आला. आज झालेल्या पावसामुळे बन परिसरातील या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाहत गेले. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता एकच पायलीचा पूल असल्यामुळे पुलाचे पाणी एकाच ठिकाणी साचल्याने नाल्याच्या काठावर असलेल्या शेतक-याच्या शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतक-यांच्या शेतातील संपूर्ण पिके खरडून निघाले, त्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतक-यानी या संपूर्ण घटनेची माहिती मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ अनिल बोंडे यांना देण्यात आली. आमदार महोदयांनी तहसीलदार यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वरुड तालुकाच्या वतीने जाड चामड्याच्या एच.जी.इन्फ्रा कंपनीला धडा शिकवण्यासाठी व शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांच्या बाजूने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची वार्ता आजूबाजूच्या परिसरात गेल्याने मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी व नागरिकांनी गर्दी केली. या तीव्र आंदोलनाच्या धसक्याने थोड्याच वेळात सुरळीला पोलीस छावणीमध्ये रुप आले. आंदोलनकर्त्यांचा व शेतक-यांचा रोष पाहता एच.जी.इन्फ्रा कंपनीच्या अधिका-यांनी सात दिवसाच्या आत तहसीलदार यांच्या कार्यालयाकडून करण्यात येणा-या पंचनाम्यानुसार आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे कबूल केले व या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी त्या पुलाच्या ठिकाणी एका पायली ऐवजी चार पायाल्यांचा पूल तातडीने तेव्हाच तयार सुद्धा करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतक-यांमध्ये प्रमोद रामहरी शेकापुरे, हर्षवर्धन चंबोळे, नंदकुमार रामहरी निकम, मंदाबाई विजय निकम, गणपती रामभाऊ गेडाम, रमेश महादेवराव गोमकाळे, मधुकरराव निकम, विनायकराव माटे, गोपाल माटे, बाळकृष्ण गेडाम, चेतन सरोदे, विनय सोनारे, मधुकर शेळके, भूषण चंबोळे, अरविंद माटे, वंदना आमले, बंटी आमले, प्रभाकरराव आमले, राजेंद्र शेळके, मनोहरराव गोमकाळे, हरिदास निकम, सुधाकरराव शेळके, साहेबराव चंबोळे यांच्या सह अनेक शेतक-यांच्या शेतातील पिके खरडून गेली. नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, तलाठी सोळंके यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतातील पाहणी केली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष मनोज माहुलकर, जिल्हा उपाध्यक्ष रविराज पुरी, शाकीब मोहम्मद, राजकुमार राउत, उदापुरचे उपसरपंच गोपाल पुंड, शहराध्यक्ष निलेश अधव, नगसेवक संतोष निमगरे, दिनेश कोहळे, राहुल लोखंडे, रोषण खुटपळे, गोलू मानकर, गणेश शेकापुरे, दीपक बोहरुपी, शाम बोहरुपी, सागर बोहरुपी, छत्रपती काळे, दीपक पवार, यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकत्यांनी व शेतक-यांनी आपल्या संवेदनशिलतेचा परिचय देत चक्का जाम आंदोलनात अडकलेल्या अॅम्बूलन्सला मार्ग मोकळा करून देण्यात आला. सुरळी – वाठोडा रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून थंड बस्त्यात रखडलेले असल्यामुळे अनेक अपघात घडत असून घोराड येथील एका व्यक्तीला जीव सुद्धा गमवावा लागलेला होता. एच जी इंफ्रा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सुरळी ते वाठोडा रस्त्यावरील पुलापासून समांतर रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु तयार करण्यात आलेला रस्ता हा अत्यंत अरुंद असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता व पावसाळ्याचे पाणी जाण्याकरिता एकाच पायलीचा पूल असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी सुद्धा देण्यात आलेल्या होत्या. परंतु कंपनीकडून तक्रारीची दखल सुद्धा घेण्यात आलेली नाही. त्याचाच परिणाम बन नाल्याच्या काठावरील शेतक-यांच्या शेतातील संपूर्ण पिके खरडून निघाली. नायब तहसीलदार कमलाकर देशमुख व तलाठी सोळंके यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेताची पाहणी केली व संपूर्ण पंचनामे तयार करून कंपनीला देण्यात येणार आहे. कंपनीच्या अधिका-यांनी सात दिवसात नुकसानग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच चार पायल्यांचा पुल तातडीने तयार करण्यात आल्यामुळे नाल्याचे संपूर्ण पाणी व वाहतुकीतला अडसर दूर करण्यात आला. या चक्का जाम आंदोलनामुळे शेतक-यांचे झालेले नुकसान भरपाई मिळवून देण्यात य

Leave A Comment