Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अमरावती दर्यापूर मार्गावर इंडिका कार व दुचाकी ची जबर धडक

अमरावतीः अमरावती-दर्यापूर महामार्गावर इंडिकाकारची दुचाकीला समोरासमोर धडक झालीण् धडकेत दुचाकी सवार गंभीर झाला दुचाकी चालक खोलापूर येथे कामानिमित्त गेला होता. खोलापूर कडून मैसपूर गावाकडे परत जात असतानि ६ जुलै रोजी रात्री ७ः३० वाजता च्या सुमारास मैसपूर फाट्यावरून १०० मीटर अंतरावर हि घटना घडली. श्याम अरुण तायडे वय ३० वर्ष रा माटरगाव चालकाचे असे नाव आहे दुचाकी चालक बाबुलाल धोके वय ३५ वर्ष रा मैसपूर असे जखमी इसमाचे नाव आहे. खोलापूर पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला ठाणेदार विजय शिगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. खंडारे वैध. शिव चरण खडसे पुढील तपास करत आहे.

Leave A Comment