Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नागरिकांना मिळणार स्वस्त दरात औषधी

यवतमाळ, दि. ७ : सध्या संपूर्ण भारतात जेनेरिक औषधांची माहिती व ख्याती वाढत आहे. यवतमाळ जिल्हयातील दुकानांमध्ये सर्दीपासून ते कँसरसारख्या असाध्य रोगांवर जेनेरिक औषधी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त रूग्णांना याचा फायदा घेता यावा, म्हणून भारत सरकारच्या जन औषधी योजनेच्या धर्तीवर जिल्हयात स्वस्त औषधी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही दुकाने पुढील प्रमाणे आहेत. शिवाय स्वस्त औषधी सेवा (रूईकर कॉम्पलेक्स यवतमाळ), उषा स्वस्त औषधी सेवा (ज्योती मंगल कार्यालय दाते कॉलेज रोड, यवतमाळ), प्रकाश स्वस्त औषधी सेवा (राणाप्रताप नगर जवळ, जयंत भिसे पतसंस्था आर्णि रोड, यवतमाळ), श्री वैष्णवी स्वस्त औषधी सेवा (नारायणराव पाटील मार्केट, उमरखेड) दारव्हा स्वस्त औषधी सेवा (महाविर नगर बस स्टँड जवळ दारव्हा),यवतमाळ स्वस्त औषधी सेवा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पाटीपुरा, यवतमाळ),पुसद स्वस्त औषधी सेवा (शिवाजी चौक, यवतमाळ रोड पुसद), लाईफलाईन स्वस्त औषधी सेवा (टागोर कॉम्प्लेक्स चौक, महाराष्ट्र बँक जवळ वणी) ,दिग्रस स्वस्त औषधी सेवा (विष्णू कामंत नगर, दिग्रस) आदी ठिकाणी स्वस्त औषधी सेवा दुकाने आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे यांनी कळविले आहे.

Leave A Comment