Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

निर्यातक्षम शेतीकरारासाठी युवकांनी पुढे यावे- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

अकोला, दि. 07 – शेतक-यांना केळी, डाळिंब , मिरची व भेंडी या भाजीपाला वर्गीय पिकांच्या निर्यात कराराच्या माध्यमातून जिल्हयातील शेतकऱ्यांना एक मोठी संधी मिळाली आहे, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी दर्जेदार तथा निर्यातक्षम मालाचे उत्पादन करुन प्रगती करावी आणि युवकांनी या कामासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले. जिलहयातुन या पुवी्र मागील वर्षीपासून केळी आखाती व पुर्वेतर आशिया खंडात निर्यात होत आहे. आता डाळिंबा सोबत दर्जेदार मिरची व भेंडी ही भाजीपाला वर्गीय पिके आता निर्यात होणार आहे. याबाबतचा करार आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात जिल्हयातील निर्यातक्षम भाजीपाला व फळपिके उत्पादक शेतकरी आणि आयएनआय फॉर्म व नागपूर येथील ईवा एक्स्पोर्ट कंपनी यांच्यामध्ये निर्यात करार झाला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यक्रमास डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, अपेडा दिल्लीचे विभागीय संचालक प्रमोद वाघमारे, निर्यात पणन मंडळ मुंबईचे संचालक डि.एम.साबळे , आयएनआय फॉर्मचे पंकज खंडेलवाल , पोर्णिमा खंडेलवाल , ईवा ॲग्रो एक्सपोर्टच्या प्रतिनिधी , रितेश अल्लडवार , निर्यात सोनल त्योहारिका , अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अकोटचे उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, यांच्यासह उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यात उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांनी आपसात विश्वास इमानदारी व समन्वय ठेवून काम केले तर येत्या 5 वर्षात याचा मोठा फायदा दिसून येणार आहे. शासनाच्या विविध येाजनांचा लाभ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घ्यावा असे सांगुन जिल्हाधिकारी पुढे महणाले की, वृक्ष लागवड ,गटशेती यासारख्या शासकीय योजनांचा लाभ घेवून शेती उत्पादक कंपन्यांनी आपला उत्पादन खर्च कमी करावा . यापुर्वी केळी निर्यात सुरु झाली आहे. आता भाजीपाला निर्यातीच्या दृष्टीने मोठे पाऊल पडले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जिल्हयातील शेतकरी मागे राहू, त्यांचा माल परदेशात निर्यात होऊन त्यांना भरघोस नफा मिळावा, या करीता जिल्हा प्रशासन व अपेडा यांनी शेतकऱ्यांना भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. भविष्यात आपल्या जिल्हयातूनही युवा निर्यातदार शेतकरी तयार व्हावेत, असे अपेक्षाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शेतक-यांनी पारंपारिक पिकांशिवाय फळ पिकांच्या शेतीकडे वळावे असे आवाहन डॉ. पंजाबराव कृषि विदयापिठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. निर्यातदार करार शेती करणा-या शेतक-यांना कृषि विदयापीठ सर्वोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान ज्ञानेश्वरी पाटील या महिला शेतकऱ्यांनी डाळिंब या फळपिकांचा करार आयएनआय फॉमच्या पोर्णिमा खंडेलवाल यांच्या सोबत केला. तसेच केळी उत्पादक कंपनीचे गजाननराव बोचे यांनी आयएनआयच्या पंकज खंडेलवाल सोबत केळी पिकाचा करार केला. आता जिल्हयात 200 एकर केळी पिकाचा करार निर्यातीसाठी झालेला आहे. आज जिल्हयातील भेंडी, आणि मिरची या भाजीपाला पिकांचा करार संदिप चव्हाण या शेतक-यांनी संदिप इंगळे या निर्यातदारासोबत केला आहे. तरुण शेतकऱ्यांना मिळणार स्वयंरोजगाराची संधी स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिदद बाळगणाऱ्या जिल्हयातील 500 तरुण शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असून त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, उत्तम मार्केट मिळावे व मालाचे ब्रॅण्डींग व्हावे. तसेच शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाकरीता आर्थिक सहकार्य मिळावे, यासाठी त्यांना वावर नावाच्या उपक्रमाच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. अकोला जिल्हयातून उत्तम गुणवत्ता असलेला शेतमाल हा निर्यात होईल. व उरलेला शेतमाल वावर च्या माध्यमातून जिल्हातंर्गत विकल्या जाईल. तरी या उपक्रमाचा शेतक-यांनी फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अकोटचे मंडल अधिकारी राजेश बोडके यांनी केले. प्रास्तविक उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी उदय राजपुत यांनी मानले. इवाचे संदिप चव्हाण यांनी कराराबाबत माहिती दिली. तर ॲग्रोस्टारचे अजय क्षीरसागर यांनी निर्यातक्षम मालाबाबत मार्गदर्शन केले. ईवाचे संचालक संदेश धुमाळ आणि उत्पा

Leave A Comment