Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याची आब्रू गेली धनंजय मुंडेंचा घणाघात

नागपूर – ढिसाळ नियोजन, लहरी वृत्ती आणि गांभीर्याचा अभाव यामुळे नागपुर अधिवेशनात आज उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्य सरकारची आब्रू गेली आहे, अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या नियोजनशुन्य कारभाराची लक्तरे काढली. नागपुर अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापुर्वीच लाईट गेल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि त्यामुळे कामकाज दिवसभर तहकुब करण्याची नामुष्की सरकारवर आली. विधीमंडळाच्या ईतिहासात लाईट गेल्यावर कामकाज बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्याच्या कुठल्याही ग्रामपंचायतीची सभा, बैठकही अशाप्रकारे बंद होत नाही. ती वेळ सर्वोच्च सभागृहावर यावी, ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तयारी नसताना केवळ दिखावा करण्यासाठी नागपुरला अधिवेशन घेण्याचा सरकारचा राज आणि बालहट्ट होता ते या निमित्ताने दिसुन आले आहे. राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले तरी देवेंद्र फडणवीस सरकारने नागपुरात अधिवेशन घेऊन मात्र जलयुक्त नागपुर राज्याला दाखवुन दिला असल्याचा टोला श्री. मुंडे यांनी लगावला. याप्रकरणी सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी करतानाच विद्युत विभागाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, महानगरपालिकेचे अधिकारी या परिस्थितीस जबाबदार असल्याने अधिक्षक अभियंत्यापासुन कार्यकारी अभियंता आणि सर्व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपाच्या ताब्यातील नागपुर महानगरपालिका असो की शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महानगरपालिका असो हे दोघेही महानगरे कुठल्याही संकटात सुरक्षित ठेवण्यात आणि किमान सार्वजनिक सुविधा पुरविण्यात अपयशी असल्याचे सांगत दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. सरकारवर फॉल बॅक प्लॅन का नव्हता? असा सवाल उपस्थित करताना सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी आज हुकल्याबद्दल वाईट वाटते असे श्री.मुंडे म्हणाले. बंगल्यात पाणीच पाणी आणि अंधारात कारभार दरम्यान नागपुरच्या रवी भवनातील 22 नंबरच्या कुटीरमध्ये राहणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी पाणीच पाणी झाल्याने मुंडे यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. आज कार्यालयात श्री.मुंडे यांनी चक्क मेणबत्त्या लावुन आपल्या कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सुरूच ठेवले.

Leave A Comment