Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • राज्यसभा में सदस्य बनाए जाएंगे राकेश सिन्हा, रघुनाथ महापात्रा, सोनल मान सिंह और रामशकल
  • NEWS FLASH: मुंबई: कांग्रेस नेता संजय निरुपम और बाबा सिद्दीकी ने ठीक किया गड्ढा
  • NEWS FLASH: पाकिस्तान: ब्लास्ट में मरने वालों की संख्या बढ़कर हुई 197
  • रेप का आरोपों के चलते गुजरात बीजेपी उपाध्यक्ष जयंती भानुशाली ने दिया इस्तीफा
  • NEWS FLASH: ढाका: गृह मंत्री राजनाथ सिंह ने बांग्लादेश की पीएम शेख हसीना से की मुलाकात
  • राष्ट्रपति ने किया राज्यसभा के लिए चार सांसदों को मनोनीत किया
  • अमित शाह का बयान, 2019 के चुनाव से पहले शुरू होगा राम मंदिर निर्माण- IANS
  • नवाज और मरियम के लौटने से पहले पाकिस्तान में 2 धमाके, 89 मरे और 180 से ज्यादा घायल
  • लाहौर में उतरा नवाज शरीफ का विमान, जल्द ही बेटी के साथ होंगे गिरफ्तार

मोझरी तीर्थक्षेत्र येथील मुलभूत सुविधांची कामे तत्काळ पूर्ण करा - विभागीय आयुक्त पियूष सिंह

अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ मोझरी तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येत आहे. मोझरीच्या तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत तेथील मुलभूत सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. बैठकीला कार्यकारी अभियंता, कार्यकारी समितीतील सदस्य व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. मोझरी येथे सार्वजनिक जागेवर नागरी सोयी उपलब्ध करुन दयाव्यात तसेच नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात यावे, असे सांगून विभागीय आयुक्तांनी गुरुदेव नगर येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, आवश्यकते नुसार बोअरवेल करावी असे निर्देश दिले. तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयालगतच्या रस्त्याचे काम करण्याबाबत आणि रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासाठी त्वरित जागा निश्चित करण्याचे आदेश संबंधिताना दिले. कंत्राटदारांनी गुरुदेव नगरची विकासकामे सुनियोजितरित्या करावी अशी सुचना पियूष सिंह यांनी केली. मोझरीसह, शेंदोळा (खुर्द), वरखेड, शिराळा, यावली (शहीद) या गावातील नाली बांधकाम, पुरसंरक्षक भिंत, क्रीडा संकुल, उदयान व सौदर्यीकरणासह इतर मुलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विकासकामांचा आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला. कौंडण्यपुर तीर्थक्षेत्री दरवर्षी होणाऱ्या दिंडी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होत असतात. श्रीक्षेत्र कौंडण्यपुर येथील नागरी सुविधांमध्ये घाट बांधकाम, पर्यटन विसावा, बालोदयान, व्यापार संकुल, उपहारगृह, विश्रामगृह, सिमेंट रस्ते, पाणी पुरवठा, विद्युतीकरण या सर्व कामांचा समावेश असून या प्रस्तावित कामांचा आढावा व संबधित कार्यान्वयीन यंत्रणेला विभागीय आयुक्तांनी सुचना केल्या. संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेले वलगाव देखील विकसीत करण्यात येत असून त्याबाबतचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकीत घेतला.

Leave A Comment