Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

वृक्ष लागवड मोहिमेसाठी प्रशासन सज्ज

अमरावती: पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवधर्नासाठी महावृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासन राबवित आहे. वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल निर्सगविषयक असंतुलनाच्या या बाबी गांभीर्याने घेणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टामध्ये यावर्षी 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून या मोहिमेस यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शासनाच्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये 13 कोटी लागवडी अंतर्गत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातील वनविभाग 47 लक्ष 50 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. विभागातील सामाजीक वनीकरण विभागाचे 25 लक्ष 98 हजारांचे उद्दिष्ट असून वनविकास महामंडळातर्फे 8 लक्ष 50 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. पाचही जिल्ह्यातील ग्रामपंचायती देखिल वृक्ष लागवडीत सक्रीय सहभागी होणार असून 42 लक्ष 85 हजार रोपट्यांची लागवड करणार आहे. विभागातील प्रत्येक प्रशासकीय विभागनिहाय वृक्ष लागवडीत कृषी विभाग 5 लक्ष 65 हजार वृक्षांची लागवड, नगर विकास विभाग 1 लक्ष 74 हजार, जलसंपदा विभागाकडून 1 लक्ष 35 हजार, इतर विभागाकडून 10 लक्ष 24 हजार असे एकूण 18 लक्ष 98 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने सुक्ष्म व व्यापक नियोजन करण्यात आले आहे. लोकसहभाग हा या नियोजनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तसेच शक्य त्या सर्व ठिकाणांचा, जागेचा वृक्ष लागवडीसाठी उपयोग करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नद्या आणि उपनद्या यांच्या दोन्ही काठावर एक कि.मी अंतरापर्यंत रॅली फॉर रिव्हर देखील राबविण्यात येत आहे. विभागातील अकोला 3, अमरावती 19, बुलडाणा 2, वाशिम 3, आणि यवतमाळ जिल्ह्यातील 9 अश्या एकूण 36 नद्या/ उपनद्यांच्या 1 हजार 631 किमी लांबीच्या नद्यावरील सुमारे 116 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सन 2018 मधील महावृक्षलागवडीचे उद्दिष्ट यशस्विरीत्या पुर्ण करण्यासाठी दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण रोपांच्या उपलब्धतेसाठी प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. विभागात जिल्हानिहाय अनुक्रमे अमरावती जिल्ह्यात 26 लक्ष, अकोला 19 लक्ष 12 हजार, बुलडाणा 23 लक्ष 73 हजार, वाशिम 13 लक्ष 88 हजार व यवतमाळ जिल्ह्यात 59 लक्ष 17 हजार वृक्ष असे एकूण 1 कोटी 41 लक्ष वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. विभागात एकूण 308 रोपवाटिका असून 3 कोटी 82 हजार रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. महावृक्षलागवडीची मोहिम एक प्रभावी लोकचळवळ व्हावी. लोकसहभागातून ही मोहिम यशस्वी होण्यासाठी कृती आराखडा व त्याची अंमलबजावणी देखील यशस्वी व उत्साहाने करणे गरजेचे आहे. महावृक्ष लागवडीची मोहिम यशस्वी करण्यासाठी गाव, तालुका, जिल्हास्तरावर चित्ररथाद्वारे वृक्ष लागवडीचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील जे आर डी टाटा स्कुल व पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात हरित सेना सदस्य नोंदणीकरिता स्टॉल्स लावण्यात आले आहे. तेथे माहितीपत्रिकेच्या माध्यमातून महावृक्षलागवड मोहिमेची माहिती देण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) व मंगळूरपीर तालुक्याची निवड पाणी फाऊंडेशन अंतर्गत झाली असून यामध्ये कारंजा (लाड) येथील 56 व मंगळूरपीर तालुक्यातील 59 अश्या 115 गावांनी सहभाग नोंदविला आहे. त्या ठिकाणी सभा घेऊन रोपवाटिका तयार करणे, रस्त्याच्या दुतर्फा पडीक जमिनीवर, खाजगी शेतात, फळबाग व वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. सन 2018 मध्ये महावृक्षलागवडीच्या मोहिमेतील नाविण्यपुर्ण लोकसहभागाच्या योजनेअंतर्गत अनेक नविन संकल्पना राबविण्यात येत आहे. नांदगावपेठ येथील टेक्सटाईल पार्क मधील उद्योगांचा यात सहभाग घेण्यात येत आहे. शेतकरी बांधवांचा सहभाग नोंदविण्यासाठी त्यांना फळबाग, बांबु लागवडीचे प्रशिक्षण देवून रोपे उपलब्ध करुन देण्यात येतील. वॉटर कप स्पर्धेमध्ये समाविष्ठ गावामध्ये वृक्ष लागवडीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानात सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कमर्चारी सहभागी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मुख्यमंत्री सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत निवड करण्यात आलेल्या कळंब तालुक्यातील देवनाळा या ग्रामपंचायतीची निवड प्रायोगिक तत्वावर करण्यात आली असून या योजनेचा उद्देश ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाच

Leave A Comment