Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

महाराष्ट्रात नव्याने 196 शाळांत अटल टिंकरिंग लॅब राज्यात-टिंकरिंग लॅबची संख्या 387

नवी दिल्ली, दि. 12 : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब उभारण्यासाठी देशातील आणखी 3 हजार शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 196 शाळांचा समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यात राज्यातील 191 शाळांची निवड झाली असून राज्यात उभारण्यात येणा-या लॅबची संख्या 387 पर्यंत पोहचली आहे. देशभरातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता व उद्योजकतेची जोपासना व्हावी, विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने अटल टिंकरिंग लॅब उभारण्यात येत आहेत. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेश मिशनचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथम रामानन यांनी आज अटल टिंकरिंग लॅब उभारण्यासाठी देशातील आणखी 3 हजार शाळांची निवड झाल्याची घोषणा केली, यामध्ये महाराष्ट्रातील 196 शाळांचा समावेश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत देशातील 5 हजार 441 शाळांची निवड करण्यात आली आहे व महाराष्ट्रातील एकूण 387 शाळांचा यात समावेश आहे. राज्यातील 387 शाळांसाठी 77 कोटी 40 लाखांचे अनुदान अटल टिंकरिंग लॅबसाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळेला टिंकरिंग लॅब तयार करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यानुसार पुढील पाच वर्षात महाराष्ट्रातील एकूण 387 शाळांना 77 कोटी 40 लाख रूपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त 66 शाळांची निवड पुणे जिल्ह्यातील 28 शाळांचा समावेश महाराष्ट्रातील निवड झालेल्या शाळांमध्ये सर्वात जास्त 66 शाळा या पश्चिम महाराष्ट्रातील असून पुणे जिल्ह्यातील 28 शाळांचा यात समावेश आहे. या विभागात कोल्हापूर (17),सोलापूर (10), सांगली (6) आणि सातारा जिल्ह्यातील 5 शाळांची निवड झाली आहे. विदर्भातील 43 शाळांचा समावेश अटल टिंकरिंग लॅब साठी विदर्भातील 43 शाळांची निवड झाली आहे. या विभागात निवड झालेल्या शाळांची जिल्हा निहाय यादी पुढील प्रमाणे. नागपूर (11), अमरावती (6), गोंदिया (5), वाशिम (4), चंद्रपूर (4), गडचिरोली (3), वर्धा (3), यवतमाळ (3), अकोला (2), भंडारा (1) व बुलढाणा (1). खान्देशातील 31 शाळांमध्ये लॅब उभारण्यात येणार खान्देश विभागातील 5 जिल्ह्यांमधील 31 शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब योजनेच्या तिस-या टप्प्यात लॅब उभारण्यात येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जास्त 16 शाळांची निवड झाली आहे. यासोबतच धुळे (6), नाशिक (6), नंदुरबार (2) आणि जळगाव जिल्ह्यातील एका शाळेचा निवड यादीत समावेश आहे आहे. कोकण विभागातील 29 तर मराठवाड्यातील 27 शाळांची निवड कोकण विभागातील 6 जिल्ह्यांमधून एकूण 29 शाळांची निवड झाली आहे. या विभागात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील 14 शाळांची निवड झाली आहे. याशिवाय मुंबई उपनगर (5), रायगड (4), मुंबईशहर (3), रत्नागिरी (2) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका शाळेची निवड झाली आहे. अटल टिंकरिंग लॅब साठी मराठवाडा विभागातील 27 शाळांची निवड झाली असून नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्ह्यांतील प्रत्येकी 5 शाळांचा यात समावेश आहे. बीड, लातूर आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी 3 तसेच औरंगाबाद जिल्हयातील 2 आणि हिंगोली जिल्हयातील एका शाळेची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 75 शाळांची निवड झाली तर दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 116 शाळांची निवड झाली आहे.

Leave A Comment