Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

बचत गटाच्या माध्यमातून साधावा स्वतःचा आर्थिक विकास – आ.डॉ.अनिल बोंडे

वरुड : कोणताही व्‍यवसाय करतांना चिकाटी पाहिजे, ती चिकाटी महिलांमध्‍ये आहे. बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे, त्‍यातुन स्‍वत: व कूटुंबाचा आर्थिक विकास साधावा. राज्‍यात अनेक महिला बचत गट स्‍थापन झाली, चांगला दृष्‍टीकोन ठेऊन कार्य करणारी बचत गटे यशस्‍वीपणे प्रगती करीत आहेत, असे प्रतिपादन मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. महिला बचत गटांना विशेष प्राधान्य देऊन केंद्र व राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठीविविध योजना अमलात आणल्या आहेत. याच अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) महाराष्ट्र शासन अंगीकृत अमरावती द्वारा स्थापित सावित्रीबाई फुले लोकसंचालीत साधन केंद्र वरुड व प्रेरणा लोकसंचालीत साधन केंद्र जरुड अंतर्गत कृषी समृद्धी कृषी समन्वयक प्रकल्प (केम) वरुड तसेच तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम जरुड द्वारा स्थापित स्वयंसहाय्य महिला बचत गटातील सदस्यांची वार्षिक सर्व साधारण सभा व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक ११ जून रोजी स्थानिक पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह वरुड येथे आयोजित करण्यात आले होते. मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते, या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वरुडच्या नगराध्यक्षा स्वाती आंडे, तहसीलदार आशिष बिजवल, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावतीच्या जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड, विभागीय साधन व्यक्ती केशन पवार,संजय इंगळे, ऋषिकेश घ्यार, पुणे येथील आयएलओच्या मास्टर ट्रेनर श्रीमती स्मिता कुलकर्णी, आयसीआय बँक विभागीय समन्वयक अमित शिंदे, वरुड पंचायत समितीच्या सदस्या अंजली तुमराम, नगरसेविका नलिनी रक्षे, रेखा काळे, रेखाअढाऊ, संगीता बेले, अर्चना घोरमोडे, भारती चौधरी, मंदा वसुले, छाया दुर्गे, आत्मा अध्यक्षा शालिनीताई चोबीतकर, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली इंद्रभूषण सोंडे, ज्योती कुकडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज माहुलकर आदींची उपस्थित होती. आमदार डॉ.अनिल बोंडे पुढे बोलतांना म्हणाले कि, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तर उंच करण्यासाठी “बचतगट” हा उपक्रम सरकारकडून चालवला जातो. स्त्रिया एकत्रित येऊन व्यवसाय करत असल्यामुळे व पारदर्शक सहकाराची प्रक्रिया असल्यामुळे स्त्रियामध्ये जास्त प्रमाणात उद्योजकता निर्माण झाली आहे. अनेक प्रकारचे उद्योग बचत गटांच्या चळवळीतून जन्माला आले आहेत, यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचा मोलाचा वाटा आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातून या बचत गटाचे कार्य चालते असे मत आमदार महोदयांनी महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलतांना व्यक्त केले. मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधाताई बोंडे आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, आजही ग्रामीण भागात पुरूषप्रधान संस्‍कृती आहे, ती बदलण्‍याची गरज आहे. देशात व राज्‍यात सरकार तर्फे चांगल्या योजना अमलात आल्या असून स्‍वच्‍छतेसाठी मोठे अभियान राबविण्‍यात येत आहे, परंतु प्रत्‍येक नागरिकांनी स्‍वत:ची जबाबदारी ओळखुन योगदान दिल्‍या शिवाय यश प्राप्‍त होणे शक्‍य नाही. अनेक महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातुन यशस्‍वीरित्‍या वाटचाल करित असुन त्‍यातील एक आपण आहात. शेतमजुर ते लघु उद्योजिका स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या जोरावर आज बचत गटातील महिलांनी मोठे यश प्राप्‍त केले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावतीच्या जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड हे प्रास्ताविक करतांना म्‍हणाले की, शुन्‍यातुन विश्‍व निर्माण करणा-यां महिलाकडुन इतर महिलांनी प्रेरणा घ्‍यावी. महिला बचत गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सदैव तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी वरुडचे तहसीलदार आशिष बिजवल हे बोलतांना म्हणाले कि, सध्या केंद्र व राज्य सरकार कडून महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी राबविण्यात येत आहे, या नोंदणी अभियानात प्रत्येक महिलांनी सहभाग घेऊन आपल्या मतदान नोंदणीचा हक्क बजावण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. याच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. यावेळी जरुड येथील विद्यार्थीनीने दहावीत ८५ गुण प्राप्त केल्याबद्दल प्रणाली राजेंद्र बोरकर तसेच हर्

Leave A Comment