Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

तिवसा तालुक्यातील विद्युत गोंधळ संपवा,लढा संघटनेचा इशारा

तिवसा शहराचे je वानखडे यांना सुधरवा अन्यथा बदली करा नाही तर झोडपणे ठरले आहे. लढा संघटनेचा इशारा मागील एक सप्ताह पासून तिवसा तालुक्यातील विविध भागात विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. थोडा जरी पाऊस वारा आला की विद्युत पुरवठा लगेच बंद केल्या जातो तिवसा तालुक्यातील सर्व नागरिक या मुळे त्रस्त झालेले आहेत त्यात विद्युत विभागाचे काही अभियंते निर्धास्त आहेत. अशांच्या विरोधात लढा संघटनेने तिवसा येथील मुख्य कार्यालयावर हल्ला बोल केला होता ,आधी उपविभागीय अधिकारी आले त्यांना सगळ्यांनी सुनावले की अमरावती चे कार्यकारी अभियंता यांच्याशीच चर्चा करू ,त्या नंतर कार्यकारी अभियंता आले,,त्यांच्या समोर वायर मन पासून ते उपविभागीय अधिकाऱयांच्या कामचुकार पणाचे उदाहरण दिले. तिवसा शहराच्या वानखडे नावाचा कामचुकार je त्या मुळे च जास्त प्रश्न वाढले त्याला एक तर बदलावा नाही तर सुधारवा नाही तर त्याला झोडपणे निश्चित आहे आणि तालुक्यातही विद्युत विभागाचा सुरु असलेला गोंधळ तातडीने मिटवा अन्यथा झोडा आंदोलन करावे लागेल असा सज्जड इशारा देखील दिला. या आंदोलनात संजय देशमुख,योगेश लोखंडे,योगेश भुसारी,साहेबराव फिटिंग,पंडित वावरे,राहुल आंबूलकर,आशिष बांबल, राजू बावरी,मोहन भुसारी आदित्य ठाकरे,सूरज सुरजूसे,सदानंद आखरे,भूषण आखरे उपस्थित होते. विद्युत विभागा चे कार्यकारी अभियंता श्री धोके,उपविभागीय अभियंता श्री तायडे,जे इ श्री चंद्रा हे देखील होते.

Leave A Comment