Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • अपक्ष उमेदवार काँग्रेस समर्थित नवनीत राणा ३६९५१ मतांनी विजयी
  • राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना दिल्या विजयाच्या शुभेच्छा
  • पालघरमधून शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी
  • बारामती येथून सुप्रिया सुळे विजयी
  • सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू
  • सूरत अग्नीतांडवप्रकरणी मालकासह तिघांना अटक, अनधिकृतपणे सुरू होते क्लासेस

राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख

मुंबई, दि. 11 : राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख मदनलाल संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्त्यासाठी नावे जाहीर केली असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष व दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली होती. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिल्याप्रमाणे या चार पदांच्या नियुक्त्या घोषित करण्यात येत असून त्यानुसार आवश्यक पुढील कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. संचेती यांची तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.✍

Leave A Comment