Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

वाशिम जिल्ह्रातील सर्व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या रुसा योजनेंतर्गत घटक 5 - नवीन मॉडेल डिग्री कॉलेज अंतर्गत प्रस्तावव्व

अमरावती. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित वाशिम जिल्ह्रातील सर्व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या रुसा योजनेंतर्गत घटक 5 - नवीन मॉडेल डिग्री कॉलेज अंतर्गत प्रस्ताव पाठविण्याकरीता विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी वाशिम जिल्ह्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयांना ईमेल द्वारे दि. 10 मे रोजी पत्र पाठवून कळविले आहे. याशिवाय मॉडेल डिग्री कॉलेज संदर्भात विहित असलेल्या गाईडलाईन्सची प्रत सुद्धा सोबत पाठविली असून सविस्तर माहिती विद्यापीठाची वेबसाईट www.sgbau.ac.in वर उपलब्ध करुन दिलेली आहे. केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या संकेतस्थळावर आकांशा जिल्ह्रांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये अमरावती विद्यापीठांतर्गत वाशिम जिल्ह्राचे नांव समाविष्ट झालेले आहे. वाशिम जिल्ह्रातील संलग्नित जे महाविद्यालये या योजनेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असतील आणि दिलेल्या गाईडलाईन्समधील निकषाची पूर्तता करीत असतील, त्या महाविद्यालयांना विहित प्रपत्रामध्ये माहिती भरुन दि. 13 मे, 2018 रोजी दु. 2.00 वाजेपर्यंत drdevelopment@sgbau.ac.in किंवा mangeshwarkhede @sgbau.ac.in या ईमेल वर पाठवावयाची आहे. नवीन मॉडेल डिग्री कॉलेज अंतर्गत महाविद्यालये निवडीसाठी गुणपद्धत निश्चित केली असून जास्त गुण प्राप्त करणा­या महाविद्यालयाला भरीव माप दिले जाणार आहे. निवड होणा­या महाविद्यालयाला 12 कोटी रुपयांचा निधीसुद्धा प्राप्त होईल. तरी वाशिम जिल्ह्रांतील सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी आणि आपले नवीन मॉडेल डिग्री कॉलेज अंतर्गत प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विकास विभागाचे उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे यांचेशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्र. वरुन संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.व्व

Leave A Comment