Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

हिमांशू रॉय घोड्यावरून पडले नसते तर कदाचित कॅन्सर समजलाच नसता!

राज्याचे पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याने पोलीस विश्वात एकच खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाने ग्रासले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. पिळदार शरीरयष्टीमुळे डॅशिंग वाटणारे हिमांशू रॉय प्रकृती खालावल्याने दोन वर्षांपासून मीडियासमोर आले नव्हते. ते फोनवरून संपर्कात असत. आज त्यांनी मुंबईतील राहत्या घरी तोंडात गोळी झाडून आपले आयुष्य संपवले. त्यांच्या कॅन्सरचे निदान कदाचित झालेच नसते जर ते घोड्यावरून पडले नसते. नेमके कसे झाले कॅन्सरचे निदान? हिमांशू रॉय हे धाडसी, साहसी पोलीस अधिकारी होते. त्यांना जिमची प्रचंड आवड होती. हॉर्स रायडिंगही त्यांना आवडत असे. दोन वर्षांपूर्वी हॉर्स रायडिंग करताा ते पडले. या दुखापतीत त्यांच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत काही केल्या बरी होत नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या. त्यानुसार उपचारही सुरु केले. मात्र हिमांशू रॉय यांना आराम वाटला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी कॅन्सरसंबंधित चाचणी केली. ज्यामध्ये हिमांशू रॉय यांना बोन मॅरोचा कॅन्सर असल्याचे समजले. कॅन्सरचे निदान झाल्याने रॉय यांनी मुंबईसह परदेशातही उपचार घेतले. पुण्यातही काही काळ उपचार घेतले. या उपचारानंतर त्यांना बरे वाटू लागले. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा जिम सुरु केले. मात्र जिम करत असताना कॅन्सरने पुन्हा डोके वर काढले. कॅन्सरमधून ते हळूहळू बरे होत होते. मात्र आपल्याला कॅन्सर झाला आहे या नैराश्याने त्यांना ग्रासले. याच आजाराला कंटाळून अखेर हिमांशू रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली

Leave A Comment