Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, दराडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी व पदाधिकाऱ्यांसमवेत मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघातील शिवसेनेसह हितचिंतक असलेल्या अन्य मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी दराडे यांनी सुरू केल्या आहेत. बुधवारी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर येथे, तर गुरुवारी पेठ, दिंडोरीसह अन्य भागात त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, निवृत्ती जाधव, नितीन आहेर, जितेंद्र वाघ, किशोर पाटील, भास्कर गावीत, मोहन गांगुर्डे आदी हजर होते. पंचायत समिती सभापती, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आदींशी दराडे यांनी चर्चा केली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, शैक्षणिक संस्था आणि राजकीय संबंध यामुळे सर्वत्र दराडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे

Leave A Comment