Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

चूक नसताना मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला मिळाली पाच लाखांची भरपाई

वडाळ्यातील भक्ती पार्क येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला कुठल्याही प्रकारची चूक नसताना त्यांच्याच सोसायटीतील रहिवाशांकडून शिवीगाळ झाली. त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी ते गेले असता पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्याऐवजी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अखेर सहा वर्षांनी त्यांना न्याय मिळाला असून राज्य मानवी हक्क आयोगाने संबंधित ज्येष्ठ नागरिकाला पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश गृह विभागाला दिले आहेत. तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि आरोपी रहिवाशांविरोधात कारवाई करण्यासही सांगितले आहे. त्यानंतर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचे पगारही रोखण्यात आले. नोव्हेंबर २०१७ पासून सुनावणी याप्रकरणी निमजे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर नोव्हेंबर २०१७ पासून याप्रकरणी सुनावणी सुरू झाली. अखेर २०१८ मध्ये सुनावणी पूर्ण झाली. सुनावणीअंती आयोगाने एका ज्येष्ठ नागरिकाशी अशा प्रकारे वागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगून गृह विभागाला निमजे यांना पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच कानडे आणि जाधव या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून पगारही रोखले. अखेर एका पोलिसाने एनसी नोंदवून घेतली जाधव आणि कानडे यांची डय़ुटी संपल्यानंतर आलेल्या सरवणकर या पोलीस अधिकाऱ्याने निमजे यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि संबंधित रहिवाशांविरोधात एनसी दाखल केली. नेमके काय आहे प्रकरण? दत्तात्रय निमजे (७५) हे निवृत्त वेटरनरी डॉक्टर असून वडाळ्याच्या भक्ती पार्क सोसायटीत राहतात. ते या सोसायटीचे चेअरमनही आहेत. दुपारी २ च्या सुमारास अतुल शेवाळे त्याची बाईक दुरुस्त करत होता. यावेळी बाईकचा मोठ्याने आवाज होत असल्याच्या तक्रारी शेजारील सोसायटीतून आल्याने निमजे यांनी अतुलला बाईकचा आवाज करू नको. रेस दिल्याने होणाऱ्या आवाजाचा त्रास होत असल्याचे सांगून बाईक मोकळ्या मैदानात घेऊन जाण्यास सांगितले. त्यावेळी अतुलने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्या वेळाने अतुल, त्याची पत्नी समीक्षा आणि काही रहिवाशांनी निमजे यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली. याबाबत निमजे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात गेले असता तेथील तुकाराम जाधव आणि कानडे या दोन पोलिसांनी निमजे यांचे ऐकून न घेता उलट त्यांनाच मारहाण केली. यावेळी निमजे यांच्या सोसायटीतील रहिवाशांनीही पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला होता

Leave A Comment