Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन

अमरावती, दि.27 : विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणूकीसाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. निवडणूकीची प्रक्रिया दि. 29 मे पर्यंत चालणार असून निवडणूकीसंदर्भात तक्रार दाखल करावयाचे असल्यास ती नियंत्रण कक्षात दु.क्र. 0721-2662364 किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 9422488375 या क्रमांकावर करता येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविली आहे. मुंबईत मंत्रालयातील निवडणूक शाखेत 24 X 7 तत्वावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दु.क्र. 022-22026441 व भ्रमणध्वनी क्रमांक 9619204746 असा आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल भारतीय जनता पक्षातर्फे प्रवीण रामचंद्र पोटे-पाटील यांनी दोन नामनिर्देशपत्रे दाखल केली. एका अर्जावर सुचक म्हणून धीरज हिवसे, राजेश साहू, चंदू बोमारे, बलदेव बजाज, विवेक कलोती, कुसुम साहू, आशिष अतकरे, संगीता बुरंगे, लवीना हर्षे, स्वाती कुलकर्णी यांच्या सह्या आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या अर्जावर सुचक म्हणून अनिता राज, स्वाती जवरे, प्रमोद राऊत, माधूरी ठाकरे, सुरेखा लुंगारे, वंदना मडगे, अजय सारस्कर, शिरीष रासने, इंदू सावरकर, प्रणीत सोनी यांनी सह्या केल्या आहेत.

Leave A Comment