Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर मतदान २१ मे रोजी

अमरावती: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक- 2018 अंतर्गत अमरावती जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर यांनी घोषित केला. कार्यक्रमानुसार निवडणूकीची सूचना दि. २६ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्रे दि. ३ मेपर्यंत दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ४ मेस करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दि. ७ मेपर्यंत मागे घेता येईल. मतदान दि. २१ मे रोजी होणार असून, त्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. मतमोजणी दि. २४ मेस होणार आहे. निवडणूक प्रक्रिया दि. २९ मेस पूर्ण होईल. निवडणूकीची आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.

Leave A Comment