Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

भीमज्योती पर्व 2018 चे भव्य आयोजन

महात्मा ज्यातीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवल कॉलनी येथील बुध्दविहाराच्या प्रांगणात प्रशिक बहुउद्देशिय संस्था यांच्याद्वारे भीमज्योती पर्व 2018 कार्यक्रमाचे दिनांक 11 ते 14 एप्रिल पर्यंत भव्य आयोजन करण्यात आले आहे. फुले, शाहु, आंबेडकरी चळवळ ज्या आधारावर उभी आहे. तो आधार म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तीचे आदर्श जीवनकार्य होय. या आदर्श व्यक्तींची जयंती भिमज्योती पर्व म्हणून प्रशिक बहु. संस्थेतर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यातून साजरी करण्यात येते. यावर्षी सुध्दा महामानवांच्या जयंती निमित्य विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केवल कॉलनी येथील बुध्द विहाराच्या प्रांगणात करण्यात येत आहे. सर्वांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून महामानवांना आदरांजली द्यावी, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे. बुधवार, दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वा. पंचशील ध्वजारोहन व भीमज्योती पर्वाचे उद्घाटन त्यानंतर 7.45 मोटार सायकल रॅली बुध्दविहार केवल कॉलनी ते महात्मा फुले चौक पर्यंत निघणार आहे. सायंकाळी 7.00 वाजता संविधान प्रा.अशोक सरस्वती व संच नागपूर यांचे आंबेडकरी किर्तन (मनोरंजन व प्रबोधनात्म्क ) कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, दि. 12 एप्रिल रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा व दुपारी 3.00 वाजता चित्रकला स्पर्धा आणि दुपारी 4.00 बुध्दीबळ, बॅटमिटन व स्लो सायकलीग रेस तर रात्री 7.50 वाजता स्मृतीशेष नारायणराव तायडे स्मृती ॲड. पंकज तायडे पुरस्कृत स्मृती प्रित्यर्थ वादविवाद स्पर्धा ( नोट बंदी व जीयटी मुळे भारतीय अर्थ व्यवस्था मजबुत झाली आहे) या स्पर्धासाठी बक्षिषे प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वाजता रांगोळी स्पर्धा, दुपारी 4.00 वाजता महिलांचे विविध स्पर्धा, सांयकाळी 7.30 वाजता वेशभूषा स्पर्धा आणि सांयकाळी 8.30 वाजता सांस्कृतिक व नृत्य स्पर्धा, रात्री 10 वाजता भीमबृध्द गीत गायण व नाटीका तर रात्री 12.00 वाजता भीमजन्म उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता सामुहिक वंदना व परित्राणपाठ, सकाळी 8.00 वाजता 127 व्या भीम जंयती निमित्य भूतपुर्व सैनिकातर्फे सलामीचे आयोजन करण्यात आले आहे. या सलामी समारंभाचे नेतुत्व सुभेदार विनायक जंवजाळ व सहकारी सैनिक करतील. सकाळी 8.30 वाजता धम्मदेसना ( प्राध्यापक सुभाष गडलिंग, पाली अभ्यासक किनवट यांच्याव्दारे ) सकाळी 9.30 वाजता परिसंवाद आंबेडकरी विचारवंत डॉ.नंदाताई तायवाडे, प्रा.भगवान फाडके आंबेडकरी विचारवंत किंनवट, जिल्हा नांदेड, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. हरीश निबांळकर,(अध्यक्ष,प्रशिक,बहु. संस्था) सुत्र संचालन प्रा.सुरेश बन्सोड हे करतील त्यानंतर 11.30 वाजता बक्षिस वितरण सोहळा व पि.एच.डी मिळविल्या बद्दल प्रा. डॉ. एस.पी.शिरसाट यांच्या सत्कार, प्रमुख अतिथी प्रशांत रोकडे (आय.आर.एस.ऑफिसर ) स्वीय सचिव, केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री दिल्ली, मा. राहूल तसरे पोलीस निरिक्षक अमरावती ,दुपारी 12.00 वाजता सहभोजन, सायंकाळी 7.00 वाजता मोटर सायकल रॅली, प्रशिक बुध्दविहार ते आंबेडकर चौक अमरावती. अशाप्रकारे 11 ते 14 एप्रिल दरम्यान भीम ज्योती पर्व 2018 अंतर्गत विविध कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भीमज्योती पर्वाच्या आयोजनासाठी प्रशिक बहु.संस्थेचे अध्यक्ष व तसेच सर्वपदाधिकारी ॲड. हरीश निंबाळकर, राजीव जामनेकर, बाळू दंदे,गणेश गवई, गिरिश गिरिधर कुकडे, अनिल हिरेखन, सुभाष शियले, महादेवराव भटकर, भगवान वाहुरवाघ, ताराचंद्र मोहोड, कैलास बनसरे, सिध्दार्थ खांडेकर, बाळकृष्ण ओगले, विनायक जंवजाळ, जयशेन थोरात, मिलिंद बागडे, प्रवीन भाऊ घोरपडे, धमेंद्र इंगळे, अजय रंगारी, सचिन तायडे, गजानन वरघट, शेखर शेंडे, सागर तायडे, अनुराग नरवाडे, प्रा. गजेंद्र शेडे, गजानन पवार (माजी सैनिक) प्रा. काशीनाथ बन्सोड, व्ही.जी.पाटील, बाबाराव शेंडे, रामचंद्र भगत, सुमीत तायडे, प्रा.दिनेश निकाळजे, गणेश इंगोलें, मिलिंद वाहुरवाघ, ईश्वरदास चक्रे, व संस्थेच सर्व सदस्य कार्यकर्त उपासक उापसिका. युवक आणि युवती आदिंचे सहकार्य लाभणार आहे

Leave A Comment