Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

बँकेकडून वार्षिक कर्ज योजना आराखडा प्रकाशित

शेतक-यांसह विविध घटकांसाठी 2018-19 या वर्षात कर्ज वितरणाच्या तयार केलेल्या वार्षिक कर्ज योजना आराखड्याचे प्रकाशन नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. त्यानुसार 3 हजार 862 कोटी रुपयांच्या कर्जवितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक आर. एल. चौहान, एसबीआयचे क्षेत्रीय व्यवस्थापक एच. एन. चौधरी, विकास व्यवस्थापक एन. व्ही. पौनीकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र झा आदी उपस्थित होते. आराखड्यात पीक कर्जासाठी 2 हजार 37 कोटी, महिला बचत गटांसाठी 94 कोटी यासह शिक्षण, घर, लघुउद्योग, दूध डेअरी आदी विविध व्यवसायांसाठी कर्जवितरणाची अपेक्षित तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. झा यांनी यावेळी दिली.

Leave A Comment