Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • राज्यसभा में सदस्य बनाए जाएंगे राकेश सिन्हा, रघुनाथ महापात्रा, सोनल मान सिंह और रामशकल
  • NEWS FLASH: मुंबई: कांग्रेस नेता संजय निरुपम और बाबा सिद्दीकी ने ठीक किया गड्ढा
  • NEWS FLASH: पाकिस्तान: ब्लास्ट में मरने वालों की संख्या बढ़कर हुई 197
  • रेप का आरोपों के चलते गुजरात बीजेपी उपाध्यक्ष जयंती भानुशाली ने दिया इस्तीफा
  • NEWS FLASH: ढाका: गृह मंत्री राजनाथ सिंह ने बांग्लादेश की पीएम शेख हसीना से की मुलाकात
  • राष्ट्रपति ने किया राज्यसभा के लिए चार सांसदों को मनोनीत किया
  • अमित शाह का बयान, 2019 के चुनाव से पहले शुरू होगा राम मंदिर निर्माण- IANS
  • नवाज और मरियम के लौटने से पहले पाकिस्तान में 2 धमाके, 89 मरे और 180 से ज्यादा घायल
  • लाहौर में उतरा नवाज शरीफ का विमान, जल्द ही बेटी के साथ होंगे गिरफ्तार

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ६ खासदारांनी घेतली शपथ

संसदेचे वरिष्ठ सभागृह असणा-या राज्यसभेत आज महाराष्ट्रातील ६ खासदारांनी सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह, केंद्रीय मंत्री व सभागृहाचे वरिष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते. शपथ घेणा-यांमध्ये महाराष्ट्रातून नवनिर्वाचित खासदार सर्वश्री नारायण राणे, कुमार केतकर आणि व्ही. मुरलीधरन यांच्यासह पुन्हा राज्यसभेवर निवडून आलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. खासदार सर्वश्री वंदना चव्हाण, अनिल देसाई यांनी मराठीत शपथ घेतली. तर, प्रकाश जावडेकर, नारायण राणे यांनी हिंदीतून आणि कुमार केतकर यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली. देशातील १६ राज्यांमधून एकूण ५८ सदस्य राज्यसभेवर निवडून आले असून महाराष्ट्रातील ६ सदस्यांचा यात समावेश आहे. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२४ पर्यंत राहणार आहे.

Leave A Comment